दिवाळीच्या तोंडावर रास्त भाव दुकानात तांदळाचा तुटवडा, दुकानदारांचे कमिशनही थकले - गोवा फॉरवर्डचे सचिवांना पत्र

नागरी पुरवठा विभागाकडून आदेश देण्यात आला असला तरी अद्याप धान्यसाठा उपलब्ध झाला नाही
Goa Forward Letter to chief secretary
Goa Forward Letter to chief secretaryDainik Gomantak
Published on
Updated on

दिवाळीच्या तोंडावर रास्त भाव दुकानात तांदूळ उपलब्ध नसल्याने दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. राज्यातील रास्त भाव दुकानात धान्याचा तुटवडा असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

नागरी पुरवठा विभागाकडून आदेश देण्यात आला असला तरी अद्याप धान्यसाठा उपलब्ध झाला नाही, ही चिंताजनक बाब असल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाने म्हटले आहे. पक्षाच्या वतीने राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र लिहले आहे.

दिवाळीच्या तोंडावर रास्त भाव दुकानात तांदूळ उपलब्ध नसल्याने दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत, अशी तक्रार फातोर्डातील लोकांनी केल्याचे या पत्रात म्हटले आहे.

राज्यातील अनेक लोकांचे संसार रास्त भाव दुकानातून मिळणाऱ्या धान्यावर चालतात. दरम्यान, धान्य वितरणात होणाऱ्या विलंबाची कारणे तात्काळ शोधून त्याबाबत उपाययोजना करण्याची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच, रास्त भाव दुकानदारांचे तब्बल एक कोटी रुपयांचे कमिशन देखील थकले असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

Goa Forward Letter to chief secretary
In Pictures: पाणी, चिखल, तारांबळ... राष्टीय क्रीडा स्पर्धेत पावासाची बॅटींग, पाहा फोटो

दुकानदारांचे कमिशन थकल्याने त्यांना देखील आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा उल्लेख पत्रात केला आहे.

केंद्राने प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ दिली असताना त्याची अंमलबाजावणी होताना दिसत नाही, असेही या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, रास्त भाव दुकानात पुढील तीन दिवसात धान्यसाठा उपलब्ध कारावा, दुकान मालकांचे थकीत कमिशन ताबोडतोब द्यावे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली जावी, निविदा प्रक्रीयेतील अडथळ्यांवर उपाय काढावा अशा मागण्या गोवा फॉरवर्डच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com