Subhash Phaldesai: सत्तरीसह नानोडा-बांबरमधील पुरातन स्थळांचे जनत केले जाणार- फळदेसाईचे आश्वासन

माळोलीतील 'कावळ्याचे पाणी', व नानोडा बांबर येथील निरंकाची राय औषधी तळ्याची पाहणी
Subhash Phaldesai:
Subhash Phaldesai:Dainik Gomantak
Published on
Updated on

सपना सामंत

Subhash Phaldesai सत्तरी तालुक्याला ऐतिहासिक महत्व आहे, आणि सत्तरी ही निसर्गाच्या सौंदर्याने नटलेली आहे. त्यात विविध पर्यटक स्थळांबरोबर पुरातन अशी स्थळे आढळतात. या पुरातन स्थळांचा मोठा इतिहास असुन त्यांचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे.

ज्या स्थळांचे महत्व आहे त्याचे महत्व टिकून ठेवण्यासाठी सरकारमार्फत चालना मिळायला हवी आणि यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सत्तरीच्या भेटी वेळी बोलताना केले.

ते पुढे म्हणाले, नगरगाव पंचायत क्षेत्रात येणाऱ्या 'कावळ्याचे पाणी', माळोली सत्तरी (पोस्त) येथे असलेल्या पौर्तुगीज काळात उभारण्यात आलेल्या आऊट पोस्ट व तुरुंग हे पोर्तुगीज राजवटीच्या पोलिस चौकीच्या पुरातत्वीय अवशेष आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीचे हे अवशेष क्रांतीवीर दिपाजी राणे, कुश्तोबा राणे, दादा राणे आदींनी केलेल्या प्रतिकारातून सत्तरीचे शौर्यपूर्ण चरित्र दाखवतात.

भारत स्वतंत्र होण्याआधीपासून माळोली, पोस्त येथे पोर्तुगीज, इंग्रजानी आऊट पोस्ट व त्याच बाजुला तुरुंग इमारतीची उभारणी केली होती. त्याकाळी स्वातंत्रासाठी लढण्याऱ्या कित्येक स्वातंत्रसैनिक, क्रांतीकाऱ्यांना ह्या तुरुंगात कोंडून ठेवले होते.

Subhash Phaldesai:
Sal River Goa: साळ नदीपात्रात अतिक्रमण, बेकायदा बांधकामाकडे पंचायतीचा कानाडोळा

सदर तुरुंग आमच्या स्वतंत्र लढ्याचे साक्षीदार आहे. कित्येक जणांनी ह्या तुरुंगात शिक्षा भोगलेली आहे, बलिदान दिलेले आहे. त्यामुळे ह्या पोतुर्गीज काळात बांधलेल्या तुरुंगाला एतिहासिक असे महत्व आहे. आमच्या येणाऱ्या पिढीला आमचा इतिहास कळला पाहिजे.

त्यामुळे आपण खात्यातर्फे या स्थळाचे जतन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. ज्या ठिकाणी बांधकाम मोडलेले आहे. ते पुन्ः बांधुन करुन त्याचे संवर्धन करण्यासाठी आपण पयत्न करणार असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

त्यानंतर नानोडा-बांबर येथील औषधी गुणधर्म आणि मायरिस्टिका दलदलीच्या (निरंकाराची राय) झाडांचा बारमाही झरा असलेल्या गोव्यातील सर्वात महत्त्वाच्या पर्यावरणीय वारसा स्थळांपैकी एक असलेल्या निरंकाराची रायला भेट देऊन पाहणी करण्यात आली.

यावेळी या स्थळाची पाहणी करताना मंत्री फळदेसाई म्हणाले, निराकाराची राय ही स्थळी बारामाही वाहत असले या तळीला औषधी गुणधर्म असुन येथे आढळणारी वनस्पती ही यु सेप आकाराची असुन त्याचे मोठे महत्व आहे.

या स्थळाला भेट देताना मनाला एक वेगळ्याच प्रकारा आनंद मिळतो. त्यात अनमोल असा ठेवा पुन्हा एकदा पहायला मिळतो. या झऱ्याचे संवर्धन व जतन करणे गरजेचे आहे. आजपर्यंत नागिरकांनी चांगल्या प्रकारे या स्थळाचे जतन केले आहे. राज्याच्या प्रस्तावित हेरिटेज धोरणात अशा पर्यावरण-सांस्कृतिक वारसा स्थळांच्या संरक्षणासाठी तरतुदी करणे गरजेचे आहे.

यावेळी मंत्र्यांनी तळीची पाहणी करुन अभिलेखागार आणि पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना लवकरत लवकर या स्थळांचा सविस्तर अहवाल तयार करण्याचा आदेश सुध्दा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com