Goa University Dainik Gomnatak
गोवा

Goa University: गोवा विद्यापीठाचा भोंगळ कारभार! नियमांना डावलून कोर्सेसला मंजुरीची घाई; अधिकार नसतानाही अभ्यासक्रम पुढे रेटण्याचा प्रयत्न

Goa University Integrated Programmes: गोवा विद्यापीठ आगामी शैक्षणिक वर्षापासून ‘अभ्यास मंडळ’ गठीत न करताच नऊ विविध विषयांचे पाच वर्षांचे एकात्मिक पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याच्या तयारीत आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोवा विद्यापीठ आगामी शैक्षणिक वर्षापासून ‘अभ्यास मंडळ’ गठीत न करताच नऊ विविध विषयांचे पाच वर्षांचे एकात्मिक पदवी अभ्यासक्रम (Integrated Programmes) सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही बाब तेव्हा उघडकीस आली जेव्हा प्रा. राहुल त्रिपाठी यांनी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाकडे तातडीच्या मंजुरीसाठी या अभ्यासक्रमाचा आराखडा पाठवला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यांनी हा निर्णय ‘ऑर्डिनन्स ३९ ए’ नुसार घेतल्याचे म्हटले जात आहे, परंतु प्रत्यक्षात तपासले असता असा कोणताही ‘ऑर्डिनन्स ३९ ए’ अशा प्रकारचा नियम अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे.

​विद्यापीठाने ‘एआय मायनर’सह सोशल सायन्समधील एकात्मिक ‘एमए’ या अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यास सांगितले आहे. या कार्यक्रमात ‘सोशल सायन्स’ हा मुख्य विषय असून त्यात राज्यशास्त्र, समाजशास्त्र, महिला अभ्यास इत्यादी विषयांचा समावेश आहे. सोबतच ‘एआय’चे ‘मायनर कोर्से’स आहेत. नियमानुसार, संबंधित प्रत्येक विषयाच्या अभ्यास मंडळाने त्यांच्याशी संबंधित कोर्सेसना मंजुरी देणे आवश्यक आहे. विद्यापीठाच्या सध्याच्या तर्काप्रमाणे, कोणतेही एक अभ्यास मंडळ या संपूर्ण एकात्मिक कार्यक्रमाच्या अभ्यासक्रमाला मंजुरी देऊ शकणार नाही. जर एका मंडळाने मंजुरी दिली, तर समाजशास्त्र अभ्यास मंडळाला हे कळणार नाही की राज्यशास्त्र अभ्यास मंडळाने नेमकी कशाला मंजुरी दिली आहे. जर त्यांना एकात्मिक कार्यक्रम सुरू करायचा असेल, तर त्यासाठी ‘एकात्मिक अभ्यास मंडळ’ असणे गरजेचे आहे.

मुख्य विषयांचे महत्त्व केले कमी

पाच वर्षांच्या समाजशास्त्र पदवी कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, यामध्ये ‘महिला अभ्यास’ या विषयाकडे जास्त कल झुकलेला असून समाजशास्त्रातील मुख्य विषयांचे महत्त्व कमी करण्यात आले आहे. तसेच यामध्ये इतिहासाचा संदर्भ अत्यंत नगण्य आहे.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, नोव्हेंबर २०२४ मध्ये राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना झाल्यापासून अध्यक्ष प्रा. राहुल त्रिपाठी यांनी आत्तापर्यंत या मंडळाची एकही बैठक बोलावलेली नाही.

नियमावलीबाबत संभ्रम

​गोवा विद्यापीठाने राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना केवळ पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा मसुदा तयार करण्यासाठी आणि त्याला मंजुरी देण्यासाठी केली होती. नव्याने संकल्पित केलेल्या पाच वर्षांच्या एकात्मिक कार्यक्रमासाठी या मंडळाला अधिकार देण्यात आलेले नाहीत. अशा परिस्थितीत ज्या कार्यक्रमासाठी अधिकारच नाहीत, त्याच्या अभ्यासक्रमाला हे अभ्यास मंडळ मंजुरी कशी देऊ शकते? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT