Goa University : ‘बीए-एलएलबी एन्‍ट्रन्‍स’ निकालात पुन्‍हा घोळ; पालक साशंक, विद्यापीठाने बदलली 9 विद्यार्थ्यांची मेरीट लिस्‍ट

Goa University BA LLB Merit List : तीन वर्षांपूर्वी आपल्‍या मुलाला फायदा व्‍हावा म्‍हणून एका महाविद्यालयातील प्राचार्याने बीए एलएलबी एन्‍ट्रन्‍स परीक्षेची गुणांकन पद्धतच बदलल्‍याने मोठा घोळ झाला होता.
Goa University BA LLB Merit List
Goa UniversityDiniak Gomntak
Published on
Updated on

मडगाव: तीन वर्षांपूर्वी आपल्‍या मुलाला फायदा व्‍हावा म्‍हणून एका महाविद्यालयातील प्राचार्याने बीए एलएलबी एन्‍ट्रन्‍स परीक्षेची गुणांकन पद्धतच बदलल्‍याने मोठा घोळ झाला होता. तसाच प्रकार यंदाही झाला नसेल ना अशी शंका कित्‍येक पालकांनी व्‍यक्‍त केली आहे.

अंतिम गुण यादी तयार करताना ९ विद्यार्थ्यांचे गुण मोजण्‍यास तांत्रिक चूक झाल्‍याचे कारण दाखवून गोवा विद्यापीठाने याआधी जाहीर केलेली मेरिट लिस्‍ट बदलण्‍याचा प्रकार घडला असून त्‍यामुळे या निकालाबद्धल पुन्‍हा संशयाचे मळभ दाट झाले आहे.

Goa University BA LLB Merit List
Goa Education: सरकारी शाळांत 380 शिक्षकांची पदे रिक्त, 'त्‍या' निर्णयामुळे शिक्षक भासणार कमी

बीए एलएलबीच्‍या पहिल्‍या वर्षासाठीच्‍या प्रवेशाची एन्‍ट्रन्‍स परीक्षा यापूर्वी मडगावातील कारे कायदा महाविद्यालय आणि पणजीच्‍या साळगावकर कायदा महाविद्यालयात घेण्‍यात आल्‍या होत्‍या. मात्र पेपरची तपासणी गोवा विद्यापीठात झाली होती. त्‍यानुसार विद्यापीठाने ५५६ विद्यार्थ्यांचे मेरिट लिस्‍ट तीन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र ते लिस्‍ट बदलून आज पुन्‍हा नवीन लिस्‍ट पाठविण्‍यात आले आहे. त्‍यात ९ जणांचे गुण मोजताना तांत्रिक चूक झाल्‍यामुळेच ही यादी बदलण्‍यात आल्‍याचे म्‍हटले आहे.

नवीन यादीबाबत...

नवीन यादीप्रमाणे जवळपास २० ते ४० गुण वाढविल्‍याचे दिसून येत असून वैदेही शेटये, श्रद्धा मसूरकर, तुषार चोडणकर, सोहम प्रभुगावकर, शौया नाईक, तस्‍मीया हलकेरी, वैष्‍णवी राठोड, त्रिशा बांदोडकर आणि वैष्‍णवी केसरकर यांचे गुण वाढविले आहे.

वैष्‍णवी केसरकर हिला पहिल्‍या यादीत १७ गुण दाखविले होते; तर दुसऱ्या यादीत ५२ गुण झाले आहेत. त्रिशा बांदोडकर हिचे २० वरून ४८, तुषार चोडणकर याचे २८ वरून ७७ तर वैदेही शेटये हिचे ३१ वरून ७० गुण झाले आहेत, श्रद्धा मसूरकर हिचे २८ वरुन ४६, सोहम प्रभुगावकर याचे २७ वरुन ३७, शौया नाईक हिचे २६ वरून ४२, तस्‍मीया हलकेरी हिचे २५ वरुन ५६ तर वैष्‍णवी राठोड हिचे २५ वरून ६५ गुण झाले आहेत.

Goa University BA LLB Merit List
Goa Education: शैक्षणिक वर्षाचा 15 दिवसांतच 'फज्जा'! उकाडा, शिक्षकांच्‍या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांची शाळांकडे पाठ

कुलसचिव म्‍हणतात, अन्‍याय नाही; पालक म्‍हणतात, मुद्दाम केले काय?

यासंदर्भात गोवा विद्यापीठाचे कुलसचिव सुंदर धुरी यांना विचारले असता, काही तांत्रिक कारणामुळे जुनी लिस्‍ट बदलण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले. ९ विद्यार्थ्यांचे गुण मोजताना तांत्रिक चूक झाल्‍याने त्‍यांचे पूर्ण गुण पहिल्‍या यादीत दिसले नव्‍हते.

एका विद्यार्थ्याने याबद्दल विद्यापीठाकडे संपर्क साधून ही चूक लक्षात आणून दिल्‍यानंतर ती चूक बदलण्‍यात आली. मात्र या नवीन यादीमुळे जुन्‍या यादीतील कुठल्‍याही विद्यार्थ्यांचे अन्‍याय झालेला नाही, असे त्‍यांनी सांगितले. मात्र दुसऱ्या बाजूने काही पालकांनी विद्यापीठाच्‍या या कृतीवर आक्षेप घेताना असे गुण मोजताना विद्यापीठासारखी सर्वोच्‍च शैक्षणिक संस्‍था पुरेशी काळजी घेत नाही का, असा सवाल केला. की काही ठराविक विद्यार्थ्यांचे फायदा मिळावा यासाठी मुद्दामहून हा घोळ घडवून आणला का अशी शंका त्‍यांनी व्‍यक्‍त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com