Goa University Professor Scandal Dainik Gomantak
गोवा

Goa University: प्राध्यापकानेच फोडला पेपर! बनावट चावीने केबिन उघडून मैत्रिणीला केली मदत; गोवा विद्यापीठातील खळबळजनक घटना

Goa University Professor Scandal: हा प्रकार एवढ्यासाठी गंभीर आहे; कारण त्यात चोरी आणि प्रेयसीला खूश करण्यासाठी प्रश्नपत्रिका देण्याचा गुन्हा घडला आहे.

Sameer Panditrao

University exam leak controversy in Goa

पणजी: गोवा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र व उपयोजित विज्ञान विभागात काही महिन्यांपूर्वी झालेली ‘चोरी’, प्रश्नपत्रिका एका मैत्रिणीला देण्याचे प्राध्यापकाचे कारनामे आणि तिला प्रथम क्रमांक मिळवून देण्याचा प्रयत्न, यांमुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडूनही कोणाविरुद्ध ठोस कारवाई न झाल्याचे प्रकरण गाजते आहे.

या प्राध्यापकाने, जो पूर्वीच विवाहित आहे - आपली प्रेयसी असलेल्या विद्यार्थिनीला मदत करण्याच्या हेतूने हे भयंकर गुन्हेगारी कृत्य केले. त्याने आपल्या विभागातील सर्व प्राध्यापकांच्या कपाटांच्या चाव्या मिळविल्या, त्या प्राध्यापकांच्या कपाटाचे केबिन उघडले, संगणक सुरू केले, याशिवाय प्रश्नपत्रिकाही प्राप्त केल्या.

या परीक्षेत या विद्यार्थिनीला चांगले गुण प्राप्त झाले. त्यामुळे या विभागातील सर्व प्राध्यापकांच्या मनात संशय निर्माण झाला. त्याचा पडताळा सर्वांना दुसऱ्या परीक्षेत आला. त्यात ही विद्यार्थिनी नापास झाली. त्यामुळे चौकशी सुरू झाली.

हे प्रकरण कुलगुरूंपर्यंत गेले. परंतु गोवा विद्यापीठाची इभ्रत धोक्यात येईल, स्वतःच्या प्रतिष्ठेला डाग लागेल म्हणून त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकायचा प्रयत्न चालविला आहे.

‘‘या विद्यार्थिनीला ती अभ्यासात हुशार नसतानाही चांगले गुण मिळाले, त्यामुळे आम्हाला संशय आला आणि आम्ही पाळत ठेवून त्या प्राध्यापकाला दुसऱ्यांदा ही चोरी करताना मुद्देमालासह पकडले. त्यानंतर त्याची चौकशीही झाली.’’ अशी माहिती याच विभागातील एका प्राध्यापकाने आज ‘गोमन्तक’ला दिली.

हा प्रकार एवढ्यासाठी गंभीर आहे; कारण त्यात चोरी आणि प्रेयसीला खूश करण्यासाठी प्रश्नपत्रिका देण्याचा गुन्हा घडला आहे. एका प्राध्यापकाने बनावट चाव्या वापरून आपल्या सहकारी प्राध्यापकांच्या केबिन उघडणे, त्यांचे संगणक तपासणे, कपाटे उघडून प्रश्नपत्रिका चोरणे, शिवाय विद्यार्थिनीला त्या उत्तरपत्रिका मिळवून देणे, हा प्रकार विद्यापीठाच्या प्रतिष्ठेलाही डाग लावतो.

हे प्रकरण कुलगुरूंकडे पोहोचूनही त्यांनी काही गंभीर कारवाई केलेली नाही. ती मुलगी या चोरीत सारखीच सामील असल्याने प्राध्यापक व विद्यार्थिनी या दोघांवर कारवाई होणे आवश्यक होते. उलट हे प्रकरण दडपून टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या ही विद्यार्थिनी पदव्युत्तर अभ्यासक्रमात द्वितीय वर्षात आहे.

सूत्रांच्या मते, गोवा विद्यापीठात कुलगुरू या तसेच इतरही काही प्रकरणांवर पांघरूण घालू पाहात असल्याने काही जबाबदार घटकांनी सरकारकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे, भौतिकशास्त्र विभागात त्याबाबत अस्वस्थता आहे. एक प्राध्यापक प्रेयसीला मदत करताना इतर प्राध्यापकांच्या कार्यालयात घुसून प्रश्नपत्रिका फोडतो, हा गंभीर गुन्हा घडला आहे. तरीही त्या प्राध्यापकाला केवळ तंबी देऊन मोकळा सोडला आहे. तसेच त्या विद्यार्थिनीवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

‘‘या प्राध्यापकाने विद्यार्थिनीला प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या. एवढाच संशय आहे, की त्याने तिलाच या प्रश्नपत्रिका दिल्या याचा पुरावा आमच्याकडे नाही. त्यामुळे तिच्याविरोधात कारवाई टाळली’’, असा युक्तिवाद या विभागातील एका प्राध्यापकाने केला; परंतु या गंभीर गुन्ह्यात गुंतलेल्या प्राध्यापकाला केवळ तंबी देऊन सोडणे, हाही एक गुन्हाच असून, विद्यापीठाच्या एकूण कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण होत आहेत.

विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाच्या माजी सदस्याची प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी उद्वेग व्यक्त केला. विद्यापीठाची प्रतिष्ठा आधीच खालावली आहे. ‘नॅक’चे नामांकन मिळविण्यासाठी विद्यापीठ अनेक कसरती करते. युरोपमध्ये अशा गुन्हेगारी कृत्यात प्राध्यापक सापडला असता, तर त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करून त्याला तडकाफडकी डच्चू दिला गेला असता. गोवा विद्यापीठात सध्या अंदाधुंद कारभार सुरू आहे. कुलगुरूंना कुलपतींचा उघड पाठिंबा असल्याची चर्चा गोव्यात सुरू आहे. त्यामुळे असले प्रकार खपवून घेतले जातात, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT