Hotel Booking Scam: आता पोलीस नाही, CBI करणार बनावट हॉटेल्सचा पर्दाफाश; पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गोवा सरकारचे प्रयत्न

Online Booking Fraud: घोटाळ्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे गोवा सरकार सीबीआयकडे तपास सोपवण्याचा विचार करत आहे
Goa tourism scams
Goa tourism scams Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू समजला जाणारा गोवा सध्या वेगवेगळ्या फसवणुकीच्या प्रकारांमध्ये अडकतोय. इथे येणाऱ्या पर्यटकांसोबत होणारा ऑनलाइन फसवणुकीचा विषय सध्या चिंताजनक ठरला आहे. आत्तापर्यंत फसवणुकीच्या या जाळ्यात देशभरातील ५०० हून अधिक पर्यटक फसवले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. या घोटाळ्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे गोवा सरकार सीबीआयकडे तपास सोपवण्याचा विचार करत आहे.

उत्तर गोवा पोलिसांनी अलीकडेच पर्यटकांना लुटणाऱ्या तीन मोठ्या ऑनलाइन फसवणुकीचे कट उघड पडले होते. या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वॉटर स्पोर्ट्सच्या खोट्या तिकिटांची विक्री, बनावट होमस्टे बुकिंग आणि सेक्स टॉयजच्या विक्रीच्या नावाखाली फसवणूक असे अनेक प्रकार पोलिसांनी उघड केले आहे. या घोटाळ्यांमध्ये सामील असलेल्या सहा फसवणूक करणाऱ्यांना पश्चिम बंगाल, दिल्ली आणि कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे.

Goa tourism scams
Goa Tourism: भाजप आमदाराने गोवा सरकारची केली कान उघडणी, 'पर्यटन घटतंय', वेळीच जागे होण्याचा दिला सल्ला

सध्या गृह मंत्रालया कडून या प्रकरणांचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे. " पर्यटन क्षेत्रातील ही फक्त स्थानिक समस्या नाही; हे देशव्यापी समस्य आहे," असे गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. हैदराबाद, ग्वाल्हेर, भोपाळ, दिल्ली आणि देशातील अनेक शहरांमध्ये सध्या हीच परिस्थिती आहे आणि या फसवणुकीचे संपूर्ण जाळे उघड करण्यासाठी आणि सर्व गुन्हेगारांना अटक करण्यासाठी सीबीआयची चौकशी महत्त्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले आहेत.

पोलिसांनी केलेल्या एक तपासात त्यांच्या हातात वॉटर स्पोर्ट्सच्या नावाखाली एका फसवणूक करणारे रॅकेट लागले. हे रॅकेट सवलत देत वॉटर स्पोर्ट्सचे आमिष दाखवायचे आणि पैसे भरून ठिकाणी पोहोचल्यानंतर पर्यटकांना त्यांची फसवणूक झाल्याची माहिती मिळायची.

दुसऱ्या प्रकरणात, एका पीडित व्यक्तीने फसव्या फेसबुक ग्रुपद्वारे होमस्टे बुक केल्यानंतर त्याचे पैसे गमावले होते, या प्रकरणात रक्कम मिळाल्यानंतर फसवणूक करणारा दिपक कुमार विश्वकर्मा गायब झाला होता.

जानेवारीमध्ये अशाच एका कारवाईत जिल्हा पोलिसांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे बनावट हॉटेल रूम बुकिंगमध्ये सामील असलेल्या आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारांना अटक केली होती. तसेच पोलिसांनी आणखीन एका कारवाईत श्चिम बंगाल, दिल्ली आणि कर्नाटकातील सहा व्यक्तींना अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com