तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) त्यांच्यासाठी सहकाराचा हात पुढे केला आहे.  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात दीदींची नवीन खेळी, गोवा फॉरवर्डला युतीची ऑफर

मडगावात आज प्रादेशिक पक्षांची बैठक, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज कोलकत्याहून गोव्याच्या (Goa) समविचारी प्रादेशिक पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन वार्ताहरांशी बोलताना केले.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील (Goa) गोवा फॉरवर्डसह (Goa Forward) प्रादेशिक पक्षांना आकर्षित करण्यासाठी तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) त्यांच्यासाठी सहकाराचा हात पुढे केला आहे. भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी एकत्र येऊया, असे आवाहन तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केले आहे. ‘आय पॅक’चे प्रमुख प्रशांत किशोर (prashant kishor) यांनी गोव्यात मुक्काम ठोकून ममतांच्या दौऱ्याची पूर्वतयारी जोरदारपणे सुरू केली असून ते प्रादेशिक नेत्यांच्या संपर्कात आहेत.

ममता बॅनर्जी यांनी येत्या 28 व 29 रोजी गोव्याचा दौरा निश्चित केला असून त्यात गोव्याच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. या काळात त्यांना गोवा फॉरवर्डसह महत्वाचे नेते तृणमूलमध्ये प्रवेश केलेले हवे आहेत. गोवा फॉरवर्ड बरोबर त्यांच्या सतत बैठका होत असून राजकीय व्यूहरचनेला जोर आला आहे.

ममता बॅनर्जी यांनी आज कोलकत्याहून गोव्याच्या समविचारी प्रादेशिक पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन वार्ताहरांशी बोलताना केले. हे गोवा फॉरवर्डसाठी आमंत्रण असल्याचा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. सरदेसाई यांनी याचे स्वागत केले असून त्यांनी यापूर्वीही तृणमूलच्या गोव्यातील आगमनाकडे आपण उत्सुकतेने पाहात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तृणमूलच्या प्रस्तावासंदर्भात विचार करण्यासाठी उद्या शनिवारी गोवा फॉरवर्डची महत्त्वाची बैठक होणार आहे. ‘आमचा राजकीय पक्ष निवडणुकीची यापूर्वीच तयारी करीत आहे. तृणमूलच्या प्रवेशाने गोव्यात निश्चित हलचल निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष नव्याने आखणी करू लागला आहे,’ अशी माहिती गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी आज दै. ‘गोमन्तक’ला दिली.

तुमचा पक्ष तृणमूलमध्ये विलीन केला जाणार असल्याच्या अफवा उठल्या आहेत. हे त्यांना ऐकवले असता ते म्हणाले, ‘कोणत्याही नव्या प्रस्तावार मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, परंतु गोवा फॉरवर्ड निश्चितच विलीन करण्याची चर्चा चाललेली नाही.’

भाजपला हरविण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावे असा विचार मी गेला बराच काळ मांडतो आहे. काँग्रेस पक्षाने या कामात पुढाकार घेण्याची आवश्यकता असताना या पक्षाचे नेते भाजपापेक्षा प्रादेशिक पक्षांच्या जीवावर उठले आहेत. त्यामुळे काँग्रेसने ती संधी गमावली अशी माहिती देऊन सरदेसाई म्हणाले, गोव्यात भाजपला हरविण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गंभीर आवश्यकता निर्माण झाली आहे. यात काँग्रेसला सहभागी करून घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही. कारण तो पक्ष गंभीर नाही. समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची विजय सरदेसाई यांना अगदीच घाई झाली आहे, अशाही प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यापूर्वी जाहीरपणे दिल्याने ते नेते भाजपला हरविण्याबाबत गंभीर नाहीत हेच सिद्ध होते.

सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला

गोव्यातील सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे, गोवा त्याचा राहिलेलाच नाही. सामान्य माणूस त्याच्या राज्यात घर घेऊ शकत नाही. गोव्याच्या निवडणुकीचे हेच आमचे ब्रीद राहील, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले. गोव्यात नेत्यांना निश्चित बदल हवा आहे. हा बदल काँग्रेस किंवा आम आदमी पार्टी देऊ शकत नाही. ज्या हिरीरीने निवडणूक लढवायला पाहिजे तेवढी ताकद काँग्रेसमध्ये नाही आणि राहुल गांधी तर प्रत्येक निवडणूक हरत आले आहेत. गोव्यातील राजकीय असंतोषाला आकार देण्याचे काम केवळ तृणमूल करू शकते, असेही ते म्हणाले.

आमची व्यूहरचना तयार

गोव्यात भाजपला हरविण्यासाठी आम्ही प्रवेश केला आहे. आम्ही सत्तेवर येऊ एवढी शक्ती आम्हाला येथे निर्माण करायची आहे. त्यासाठी पुढचे दोन महिने पुरेसे आहेत, अशी माहिती ‘आय पॅक’चे प्रमुख प्रशांत किशोर यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिली. ते म्हणाले, आमची व्यूहरचना तयार आहे. आम्ही ५० टक्के नवे चेहरे देऊ. राजकारणात नसलेले बुद्धीवादी विचारवंतही निवडणुकीत उतरविलेले आम्हाला हवे आहेत. आम्हाला एक तृतियांश महिला उमेदवार हव्या आहेत. अनेक प्रादेशिक नेते आमच्या सतत संपर्कात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT