पेडणे : गोव्यातील (Goa) जनता भाजप सरकारला (BJP Government) कंटाळली असून महागाईने त्रस्त झालेले लोक येत्या निवडणुकीत बदल घडवून आणणार आहेत. भाजपला सक्षम पर्याय म्हणून गोव्यात तृणमूल काँग्रेस पक्ष (Trinamool Congress) आला असून गोमंतकीय जनतेने या पक्षाला साथ द्यावी, असे आवाहन माजी आमदार तथा तृणमूल काँग्रेसचे नेते लवू मामलेदार यांनी पेडणे येथे केले. पेडणे येथे काँग्रेसचे कार्यकर्ते तेलंग पंचवाडकर (Telang Panchwadkar) यांच्या तृणमूल काँग्रेस पक्ष प्रवेश कार्यक्रमात मामलेदार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साहित्यिक तथा तृणमूलचे नेते एन. शिवदास, संतोष मांद्रेकर, सूरज गरड उपस्थित होते. यावेळी मामलेदार म्हणाले, की पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींनी भाजपला धडा शिकवला असून अनेक अडचणींवर मात करत त्यांनी पश्चिम बंगालमध्ये परत एकदा सत्तास्थान प्राप्त केले आहे.
देशात भाजपला पर्याय लोक शोधत होते. तृणमूल काँग्रेसच्या रूपाने लोकांना पर्याय मिळाला आहे. यावेळी एन. शिवदास म्हणाले, मतदारांना निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने दाखवण्याचे काम भाजप सरकार करत आहे. महिन्याला दोन हजार रुपये बेकारी भत्ता मिळणार, अशी आमिषे दाखवून लोकांची मते मागितली जात आहेत. प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये येणार अशी आश्वासने दिली. मात्र पैसे आलेच नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.