तृणमूल काँग्रेस परिवर्तन घडविण्यास सक्षम: आमदार गावकर

गोव्यात (Goa) व देशात केवळ ममता दिदी (Mamta Didi) परिवर्तन घडवून आणू शकतात.
Trinamool Congress
Trinamool CongressDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोमंतभूमीवर गोमंतकियांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) नेत्या ममता बॅनर्जी यांना बळकटी देण्यासाठी मी या पक्षाला अधिकृत पाठिंबा देत आहे. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने काहीच केले नाही. गोव्यात (Goa) व देशात केवळ ममता दिदी (Mamta Didi) परिवर्तन घडवून आणू शकतात. आमदारकीचा कार्यकाळ संपल्यावर मी या पक्षात प्रवेश करीन असे मत सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर (MLA Prasad Gavkar) यांनी व्यक्त केले. तृणमूल काँग्रेसचे नेते व राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन तसेच लुईझिन फालेरो यांच्या उपस्थित झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार गावकर यांनी तृणमूल काँग्रेला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांचे आमदार प्रसाद गावकर यांचे बंधू संदेश गावकर यांनी पक्षामध्ये प्रवेश केला. फालेरो यांनी त्यांना पक्षाच्या चिन्हाचा पट्टा व झेंडा देऊन स्वागत केले. यावेळी पुढे बोलताना आमदार गावकर म्हणाले की, ममता दिदी यांनी देशात बदल घडवण्यासाठी उचललेल्या पावलांना बळकटी देण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. गेल्या 60 वर्षात अनेक सरकारे आली मात्र गोमंतकियांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकलेले नाही. गोवा भरकटला जात आहे. त्यामध्ये बदल करण्यासाठी ममता दिदींच्या माध्यमातून ते शक्य आहे. ज्या विचाराने विधानसभेत आमदार म्हणून आलो ते साध्यच झाले नाही. गेली पाच वर्षे वाया गेली. त्यामुळे आगामी २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत दिदींचे विचार पुढे नेण्यासाठी मदत करणार असल्याचे गावकर यांनी सांगितले.

देशात भाजप सरकारविरोधात लढा देण्याचे धाडस तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यामध्ये आहे हे पश्‍चिम बंगाल निवडणुकीत त्यांनी महिलाशक्ती काय आहे ते सिद्ध करून दाखवले. त्यामुळे केंद्रात व राज्यात बदल घडवून आणायचा असल्यास ममता दिदींचे विचार व हात बळकट करण्यापासून पर्याय नाही.

Trinamool Congress
युतीबाबत काय ते ठरवा, अन्यथा माझा निर्णय घेईन!

केंद्राच्या प्रत्येत जनहितविरोधी निर्णयाविरुद्ध आवाज उठवण्यास तृणमूल काँग्रेसने नेहमीच प्रथम पुढाकार घेतला आहे. किसानविरोधी विधेयके, नोटबंदी, इंधन दरवाढ, स्वयंपाक गॅस दरवाढ याविरुद्ध ममता बॅनर्जी यांनी उठविला. त्यांचा पक्ष निष्ठा, विकास व पक्का निश्‍चय असलेला आहे त्यामुळे या राष्ट्रीय पक्षाकडे देशात तसेच गोव्यातही अनेकजण प्रवेश करत आहेत असे खासदार डेरेक ओब्रायन (Derek O'Brien) म्हणाले. गोव्यातील भाजप सरकारने जनतेला कर्जाच्या बोजाखाली टाकले आहे. बेरोजगारीचे मोठे संकट सध्या गोव्यात आहे त्यात बदल तृणमूल काँग्रेस आणू शकते असे लुईझिन फोलेरो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com