Ramesh Tawadkar And Govind Gaude  Dainik Gomantak
गोवा

Goa Tribal Leaders Unity: आदिवासी नेत्यांच्या 'ऐक्या'वर अखेर मोहोर, तवडकर गावडेंमधील मतभेद संपुष्टात; निवडणुकीच्या तोंडावर भाजपची मोठी रणनीती

Ramesh Tawadkar And Govind Gaude Patch up: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी नेत्यांमधील ऐक्यावर मोहोर उमटवण्यात आली आहे. सभापती गणेश गावकर हे गेले १५ दिवस यासाठी प्रयत्न करत होते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी नेत्यांमधील ऐक्यावर मोहोर उमटवण्यात आली आहे. सभापती गणेश गावकर हे गेले १५ दिवस यासाठी प्रयत्न करत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवडाभरापूर्वी आमदार गोविंद गावडे आणि मंत्री रमेश तवडकर यांना रात्रभोजाच्या निमित्ताने एकत्र आणण्यात सभापतींना यश आले. त्यानंतर मंगळवारी दुपारी जेवणाच्या निमित्ताने तिघे एकत्र जमले आणि त्या ऐक्यावर मोहोर उमटवली.

प्रामुख्याने तवडकर आणि गावडे यांच्यात मतभेद होते. तवडकर हे सभापती आणि गावडे हे मंत्रिपदी असताना त्यांचे वाकयुद्ध चांगलेच रंगत असे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही त्यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी बैठका घ्याव्या लागल्या होत्या. अखेर भाजप पक्ष पातळीवरही हे मतभेद दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. या दरम्यानच्या काळात गावडे यांचे मंत्रिपद गेले. तवडकर हे सभापतिपद सोडून मंत्री बनले. या काळात हे मतभेद तीव्र झाल्याचे दिसत होते. त्यांच्यात दिलजमाई होईल, असे वाटत नव्हते. मात्र, गेले १५ दिवस सभापती यासाठी प्रयत्न करत होते आणि आता त्याला यश मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आदिवासी आमदारांची संख्या वाढविण्यावर भर

आदिवासी समाजातील मतभेदांचा फायदा इतरांना घेता येऊ नये. शक्य झाल्यास आदिवासी समाजाचा नेता मुख्यमंत्रिपदापर्यंत पोचवण्याचे प्रयत्न करण्यावरही आजच्या बैठकवजा मेजवानीवेळी चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आदिवासी आमदारांची संख्या जास्तीत जास्त अशी असेल, यावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. या राजकीय उलाढालींमुळे गोव्याच्या राजकारणात काय होणार, अशी चर्चा आहे.

आदिवासी नेते एकत्र आले, ही गोष्ट खरी आहे. समाजातील नेत्यांमधील मतभेद मिटवण्यासाठी पुढाकार घेणे, ही नैसर्गिक गोष्ट आहे. सर्वजण एकत्र आले तर समाजाची घोडदौड कोणी रोखू शकणार नाही, हेच सत्य आहे.

- गणेश गावकर, सभापती.

प्रेरणा दिनापूर्वीच ही माहिती बाहेर कशी फुटली? या ऐक्यासाठी मीच यापूर्वी प्रयत्न करत होतो. सर्वांनी समाजासाठी एकत्र येण्यात काहीच वावगे नाही. २५ मे रोजी याची वाच्यता करण्याचे ठरले होते.

- रमेश तवडकर, आदिवासी कल्याणमंत्री.

मला या विषयाची काहीच कल्पना नाही, असे मी म्हणेन. म्हणूनच मला या विषयावर बोलायचे नाही. हा विषय माझ्यासमोर तूर्त नाही, एवढेच मी म्हणेन.

- गोविंद गावडे, आमदार.

राज्‍यातील अनुसूचित जमातीला विधानसभा निवडणुकांत आरक्षण देण्‍यासंदर्भात मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मी तसेच एसटी नेते लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्‍याचे आदिवासी कल्‍याणमंत्री रमेश तवडकर यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.

एसटी आरक्षणासंदर्भात आतापर्यंत ज्‍या घडामोडी घडल्‍या, त्‍याची माहिती मिशन एसटी आरक्षण चळवळीच्‍या नेत्‍यांना दिली आहे. राज्‍य सरकारने याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली आहे. लोकसभेत याबाबत विधेयक आले होते, परंतु काही कारणांमुळे ते बारगळले. या विधेयकाला उशीर होत आहे, हे मला मान्‍य आहे. त्‍यामुळेच पुन्‍हा दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेण्‍याचे ठरवले आहे, असे तवडकर म्‍हणाले.

एसटी आरक्षणात अडथळे नाहीत. येत्‍या शुक्रवारी होणाऱ्या राज्‍य मंत्रिमंडळाच्‍या बैठकीत मी हा विषय मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांच्‍यासमोर उपस्‍थित करून अमित शहांच्‍या भेटीची तारीख निश्‍चित करणार आहे. शहा गेल्‍या काही महिन्‍यांत व्‍यस्‍त होते. त्‍यामुळे त्‍यांच्‍या भेटीची तारीख ठरत नव्‍हती, परंतु त्‍यांची लवकरच भेट घेऊ, असेही त्‍यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Noida Fire: नोएडातील पाच मजली इमारतीला भीषण आग; दोन जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माचा आक्रमक अवतार? भर मैदानात 'या' खेळाडूला मारली लाथ, कॅमेऱ्यामागे नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: HRA मध्ये अपेक्षेपेक्षा मोठी वाढ होण्याची शक्यता; फिटमेंट फॅक्टर ठरणार निर्णायक, पाहा संपूर्ण गणित

Mulgao Accident: मुळगाव येथे भीषण अपघात; ओव्हरटेकच्या नादात कारची दुचाकीला धडक, दोघे जखमी; एकाची प्रकृती चिंताजनक

Team India: टीम इंडियात सर्व काही आलबेल नाही? गौतम गंभीर-अजीत अगरकर यांच्यात मतभेद? माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT