Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

Ramesh Tawadkar Goa Politics News: तवडकरांचा पुनरुच्चार : राजीनाम्याबाबतचे वृत्त खोटे; वृत्ताअंती चौथ्या दिवशी खुलासा
Ramesh Tawadkar
Ramesh TawadkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पुढील दीड वर्षे सभापतिपदी राहून आपल्याला सभापतिपदाचा कार्यकाळ पूर्ण करायचा होता. आपल्याला मंत्रिपद नकोच होते. परंतु, आपल्याकडे असलेल्या संघटन कौशल्यामुळे पक्षाच्या दिल्लीतील वरिष्ठांनी आपल्याला मंत्रिपद स्वीकारण्याचे आदेश दिले, त्यामुळेच आपण मंत्रिपद स्वीकारल्याचा पुनरुच्चार मंत्री रमेश तवडकर यांनी गुरुवारी पर्वरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला.

शिवाय आपल्या राजीनाम्याबाबत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त खोटे असल्याचे त्यांनी वृत्तानंतर चौथ्या दिवशी खुलासा केला. काहीच दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या बैठकीत मंत्री रमेश तवडकरांनी आपल्याला दिलेल्या खात्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आपल्याला देण्यात आलेल्या खात्यांमध्ये 'दम' नसल्याचे सांगत, प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली होती.

Ramesh Tawadkar
पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

याबाबतचे वृत्त वृत्तपत्र आणि सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभरात खळबळ माजली होती. यासंदर्भात गुरुवारी पत्रकार परिषद घेत मंत्री तवडकर यांनी स्पष्टीकरण दिले. विधानसभेचे सभापतीपद स्वीकारत असतानाच आपण सभापतीपदाचा कार्यकाळ पूर्ण करण्याचे निश्चित केले होते. त्याच निर्धाराने आपण सभापतीपदाला पूर्ण न्याय देण्याचा पूर्ण केला.

परंतु, आपली मंत्रिपदी वर्णी लागण्याचे समजल्यानंतर विधानसभेचे गत पावसाळी अधिवेशन संपताच आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आपल्याला मंत्रिपद नको, अशी विनंती त्यांना केली होती. पण, आपल्याकडे संघटन कौशल्य असल्याची माहिती पक्षाला आहे. आगामी निवडणुकांत त्याचा फायदा घेण्यासाठी मंत्रिपद स्वीकारावे, असे आदेश पक्षानेच आपल्याला दिले.

Ramesh Tawadkar
Valpoi Road Issue: होंडा येथील रस्त्यांची दुरवस्था, गावकरवाडा ते पोलिस स्टेशनपर्यंत दैना; नवरात्रीपूर्वी डागडुजी करण्याची स्थानिकांची मागणी

त्यामुळेच आपण मंत्रिपद स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले, मातीचे सोने करण्याची धमक आपल्याकडे आहे. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या खात्यांना आवश्यक तितका निधी आणून त्याद्वारे जनतेची सेवा करण्यात आपण निश्चित यशस्वी होईन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

चार दिवसांनंतर दिले स्पष्टीकरण

मंत्री म्हणून देण्यात आलेल्या खात्यांबाबत नाराज असलेले रमेश तवडकर राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त १५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लढवण्यात येत होते.

तरीही गेल्या चार दिवसांत तवडकर यांनी यावर कोणतेही भाष्य केले नव्हते. अखेर, गुरुवारी चौथ्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com