Ramesh Tawadkar: ''मी कधीच मंत्रिपदाची मागणी केली नाही...''; मंत्रिमंडळ विस्तारावर सभापती तवडकर स्पष्टच बोलले

Goa Cabinet Reshuffle: गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येत आहेत. सभापती रमेश तवडकर यांची वर्णी मंत्रिमंडळात लागणार अशा चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.
Ramesh Tawadkar: ''मी कधीच मंत्रिपदाची मागणी केली नाही...''; मंत्रिमंडळ विस्तारावर सभापती तवडकर स्पष्टच बोलले
Ramesh Tawadkar Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सासष्टी: मी सभापतीपदावर खूष आहे. मी कधीही आणि कोणाकडेही मंत्रिपदाची मागणी केलेली नाही. मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही हेही मला ठाऊक नाही. मला त्यात रसही नाही. मंत्रिपदापेक्षा कार्यकर्त्यांचे हित माझ्यासाठी महत्वाचे असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी बुधवारी (4 डिसेंबर) मडगावात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

लोकोत्सोवाचे आयोजन!

लोकोत्सवाचे आयोजन करुन मला ताकद दाखवायची नाही. 1994 पासूनच मी लोकोत्सवाचे आयोजन करतोय. माझी कोणासोबतही स्पर्धा नाही. कार्यकर्त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तसेच, एसटी समाजात दुफळी आहे असे मी मानत नाही. बोटावर मोजण्याइतक्याच लोकांनाच असे वाटते, असेही तवडकर पुढे पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले.

Ramesh Tawadkar: ''मी कधीच मंत्रिपदाची मागणी केली नाही...''; मंत्रिमंडळ विस्तारावर सभापती तवडकर स्पष्टच बोलले
Ramesh Tawadkar: 'अशा लोकांच्या सावलीतही राहायची इच्छा नाही'; तवडकरांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

मंत्रिमडळ विस्ताराची चर्चा

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येत आहेत. सभापती रमेश तवडकर यांची वर्णी मंत्रिमंडळात लागणार अशा चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. मात्र अजूनपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्तू सापडलेला नाही. मात्र, महाराष्ट्रातील निवडणुकांनंतर आणि आता तिथे सरकार स्थापन झाल्यावर गोव्यातील राजकारणात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa ST reservation latest news
Goa Cabinet Decisions, CM Pramod Sawant
Modi Cabinet Reshuffle 2026
Pramod Sawant Cabinet Meeting
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com