Pele Fernandes (Traditional fisherman) Dainik Gomantak
गोवा

Independence Day Parade: सचिन तेंडुलकरला मासेमारीचे धडे देणाऱ्या 'गोव्याच्या पेलेंना' केंद्र सरकारकडून आलंय आमंत्रण, वाचा नक्की काय घडलंय..

कोलव्‍याचे सेबीही जाणार : देशभरातून सुमारे ५० मच्‍छिमार यासाठी दिल्‍लीत आपल्‍या कुटुंबांसह हजर रहाणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Independence Day Parade: क्रिकेटचा देव असलेल्‍या सचिन तेंडुलकर यांना बाणावलीच्‍या समुद्रात पारंपरिक मासेमारीचे धडे देणारा बाणावली येथील पारंपरिक मच्‍छीमार पेले फर्नांडिस यांना 15 ऑगस्‍ट रोजी नवी दिल्‍लीत होणाऱ्या स्‍वातंत्र्य दिनाच्‍या परेडमध्ये उपस्थितीसाठी आमंत्रण देण्‍यात आले.

कोलवा येथील आणखी एक मच्‍छीमार सेबी फर्नांडिस यांनाही केंद्र सरकारकडून हे आमंत्रण मिळाले आहे. स्‍वातंत्र्य दिनाच्‍या परेडचे दर्शन घेण्‍यासाठी मच्‍छीमारांना आमंत्रण देण्‍याची ही पहिलीच वेळ असून देशभरातून सुमारे ५० मच्‍छिमार यासाठी दिल्‍लीत आपल्‍या कुटुंबांसह हजर रहाणार आहेत.

सचिन तेंडुलकर यांच्‍यासह कित्‍येक सेलिब्रेटींशी घरोबा असलेल्‍या पेले यांनी या आमंत्रणाबद्दल ‘दै. गोमन्‍तक’शी बोलताना सा पारंपारिक मच्‍छिमारांकडे आतापर्यंत सर्वांचे दुर्लक्ष झालेले आहे. अशा परिस्‍थितीत आम्‍हाला या परेडमध्ये सामील होण्‍याचे केंद्र सरकारकडून निमंत्रण मिळणे, ही आमच्‍या समुदायासाठी विशेष बाब म्‍हणावी लागेल.

या परेडचे दर्शन हा माझ्‍यासाठी भाग्‍याचा क्षण असेल,असे ते म्‍हणाले. यापूर्वी कोळ्‍याच्‍या जाळ्‍यांत अडकून जखमी झालेल्‍या कित्‍येक कासवांना पेले यांनी जीवदान देण्‍याचे काम केल्‍याने गोवा मच्‍छिमार खात्‍याकडून त्‍यांचा सन्‍मानही झाला होता.

मच्‍छिमार खात्‍याचे उपसंचालक चंद्रकांत वेळीप यांना याबद्दल विचारले असता, स्‍वातंत्र्य दिनाच्‍या परेडसाठी देशभरातून कारागिर आणि पारंपरिक व्‍यावसायिकांना आमंत्रण दिले जाते. यावेळी आमच्‍या खात्‍याकडून गोव्‍यातील तीन मच्‍छिमारांची नावे पाठविली होती. त्‍यापैकी दोघांना या कार्यक्रमाचे आमंत्रण आले आहे, असे त्‍यांनी सांगितले.

पेले यांचा सुधा मूर्तींशी संवाद

यापूर्वी पेले यांचा सुधा मूर्ती यांच्‍याबरोबर संवाद साधतानाचा असाच एक व्‍हिडिओ व्‍हायरल झाला होता. त्‍यात त्‍यांनी मूर्ती यांना येथे गोव्‍यात आम्‍ही येणाऱ्या ब्रिटीश पर्यटकांची चांगली सुरक्षा राखू.

मात्र, तुमच्‍या जावयांना ब्रिटनमध्‍ये स्‍थायिक झालेल्‍या गोवेकरांची चांगली काळजी घ्‍या, असे आमच्‍यावतीने सांगा असे सांगितले होते. त्‍यावेळी सुधा मूर्ती यांनीही त्‍यांना हसून दाद दिली होती.

‘दिल्‍लीत जाण्‍यासाठी माझी पत्‍नी उत्‍सुक आहे. ही परेड पाहण्‍याबरोबरच आपल्‍याला पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे जवळून दर्शन घडणार याचेच अप्रूप तिला जास्‍त आहे. ही दिल्‍ली भेट आमच्‍यासाठी खास असेल’. -पेले फर्नांडिस, बाणावली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Beef Seized: बेळगावातून गोव्यात बेकायदेशीर मांसाची तस्करी, 1930 किलो गोमांस जप्त; दोघे अटकेत

Viral Video: आधी पठ्ठ्यानं रॅपिडो रायडरला फोन करुन बोलावलं अन् नंतर असं काम करुन घेतलं... सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Bihar Crime: चेटकीण असल्याचा संशय, 250 लोकांनी घेरुन एकाच घरातील 5 जणांना ठार केले, पेट्रोल टाकून मृतदेह जाळले

Fashion Factory Exchange Festival: जुने कपडे द्या अन् ब्रँडेड कपडे घ्या...! मुकेश अंबानींचं मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट; कसं ते जाणून घ्या

Heavy School Bag: मुलांच्या पाठीवर 'दप्तराचे' आणि डोक्यावर 'अभ्यासाचे' ओझे का वाढते आहे?

SCROLL FOR NEXT