Goa Accident: गोव्यात रस्ते अपघातप्रकरणी 251 जणांना शिक्षा तर 350 चालक ठरले निर्दोष... सहा वर्षातील आकडेवारी

गेल्या 6 वर्षांतील माहिती; गंभीर आणि जीवघेण्या 2898 दुर्घटनांची पोलिसांत नोंद
Goa Accident | Goa News
Goa Accident | Goa News Dainik Gomantak

Goa Accident News: राज्यात रस्ता अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असताना त्यात मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. या अपघातांचा पंचनाम्यात किंवा तपासकामातील त्रुटीमुळे किंवा ठेवण्यात आलेले आरोप सिद्ध न झाल्यामुळे पुराव्याअभावी न्यायालयातून संशयित सहीसलामत निर्दोष सुटतात.

Goa Accident | Goa News
Banastarim Bridge Accident: बाणस्तारी अपघातप्रकरणी पोलिसांची कृती शंकास्पद; स्वप्निल भोमकर

या काळात मृत्यू व गंभीर जखमी झाल्याप्रकरणी 2898 रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. आतापर्यंत न्यायालयाने दिलेल्या निवाड्यात 350 चालकांची निर्दोष मुक्तता झाली आहे तर 251 जणांना शिक्षा ठोठावली आहे.

त्यामुळे अपघातप्रकरणी चालकांचे निर्दोषमुक्त होण्याचे प्रमाण शिक्षा होण्यापेक्षा अधिक आहे. राज्यात 2017 पासून मृत्यू आणि गंभीर जखमी झाल्याप्रकरणी 2,898 रस्ता अपघातांची नोंद झाली असून त्यामध्ये 980 अपघातांत नागरिकांचे मृत्यू झाले आहेत.

Goa Accident | Goa News
Goa Mining Case: ‘त्या’ खाणींसंदर्भातची जनसुनावणी रद्द करा....

दररोज 114 चालकांवर कारवाई

‘वाहतूक खात्याने केलेल्या कारवाई 2022 मध्ये 1017 जणांविरुद्ध मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी त्यांचे चालक परवाने निलंबनासाठी शिफारस केली आहे. यावर्षी 2023 मध्ये मद्यपानप्रकरणी 530 जणांच्या परवाने निलंबनासाठी शिफारस केली आहे.

विनाहेल्मेटप्रकरणी 18,264 चालकांवर कारवाई झाली आहे. त्यामुळे गेल्या 15 महिन्यात सरासरी प्रत्येक दिनी 114 चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यावर्षी 2023 मध्ये जूनपर्यंत 163 जणांना मृत्यू आला आहे, तर 162 जण गंभीर जखमी झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com