Goa Janata Darbar: म्हापसा, केपे येथे 'या' दिवशी भरणार दुसरा जनता दरबार; मंत्री गुदिन्हो, खंवटे राहणार उपस्थित

पहिल्या 'जनता दरबार'मधून सुटल्या अनेकांच्या अडचणी
Goa Janata Darbar:
Goa Janata Darbar: Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa 2nd Janata Darbar: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारतर्फे गोव्यात विविध लोकपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. पैकी सरकार तुमच्या दारी, प्रसाशन तुमच्या दारी, जनता दरबार आणि मुख्यमंत्र्यांचा फोन इन कार्यक्रम हॅलो गोयंकार हे यातील महत्वाचे कार्यक्रम आहेत.

पहिल्या जनता दरबारला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसऱ्या जनता दरबारची तयारी गोवा सरकारने केली आहे. 14 ऑगस्ट रोजी दुसरा जनता दरबार होणार आहे. म्हापसा आणि केपे येथे हा उपक्रम होणार असून यामध्ये वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, पर्यटन मंत्री रोहन खंवटे हे उपस्थित राहणार आहेत.

Goa Janata Darbar:
Goa Police News: गोव्यात ड्रग्ज नेमकं पुरवतो कोण? पाच वर्षात 947 खटले; पण माग काढण्यात पोलिस अपयशी...

दोन्ही मंत्री या जनता दरबारमध्ये लोकांचे प्रश्न, शंका ऐकून घेतील. नागरीकांना अधिकाधिक चांगली सेवा देत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सर्व सरकारी विभागांनाही ही माहिती दिली गेली आहे.

सुरवातीला खंवटे यांच्याऐवजी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे उपस्थित राहणार होते. तसेच केपे ऐवजी मडगाव येथे जनता दरबार होणार होता, पण आता नव्या माहितीनुसार म्हापसा आणि केपे येथे जनता दरबार होणार आहे.

यापुर्वी 3 जुलै रोजी म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिर सभागृहात जनता दरबार झाला होता.उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने याचे आयोजन केले होते. यात सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी लोकांची गाऱ्हाणी ऐकून त्यांच्या तक्रारींचे निरसन केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com