Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: यंदाही देशी पर्यटकांवरच सारी 'भिस्त'

Goa Tourism: युके आणि आता रशियातून येणारी चार्टर विमाने रद्द होऊ लागल्याने पर्यटक उद्योगातील घटकांना धक्का बसला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: राज्यातील पर्यटन हंगाम सुरू झाला असून यंदा देखील देशी पर्यटकांवरच तो अवलंबून असणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. युके आणि आता रशियातून येणारी चार्टर विमाने रद्द होऊ लागल्याने पर्यटक उद्योगातील घटकांना धक्का बसला आहे, तर देशी पर्यटक गोव्यात येण्यासाठी आतुर असल्याने किमान त्या अनुषंगाने दिलासा मिळाला आहे.

कोरोना महामारीमुळे पर्यटन उद्योग देशी पर्यटकांवर अवलंबून होता. आता आंतरराष्ट्रीय पर्यटक येण्याची शक्यता निर्माण झाली होती, परंतु रशिया - युक्रेन युद्ध आणि युकेतून येणाऱ्यांसाठी ई - व्हिझा सुविधा बंद असल्याने पर्यटकांच्या येण्यावर परिणाम झाला.

‘ई-व्हिझा’साठी केंद्राला विनंती: पर्यटन उद्योगातील संघटनांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची भेट घेऊन त्यांना युकेतून येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘ई-व्हिझा’ सुविधा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिण्याची विनंती केली आहे.

तसेच हल्लीच धर्मशाळा, हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) येथे झालेल्या पर्यटन उद्योगाच्या परिषदेत पर्यटनमंत्री खंवटे यांनी केंद्रीय पर्यटनमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना ही सुविधा सुरू करण्यासंदर्भात विनंती केली आहे.

नीलेश शाह, अध्यक्ष, गोवा प्रवास आणि पर्यटन संघटन-

ई - व्हिझा सुविधा सध्या बंद असल्याने युकेतील नागरिकांना व्हिझासाठी स्वतःहून कार्यालयात जावे लागत आहे. या प्रक्रियेसाठी अगोदर मोठ्या संख्येने अर्ज येत असल्याने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये व्हिझा मिळण्याची शक्यता कमीच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT