Goa Tourism  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोवा पर्यटनासाठी अच्छे दिन? 'इंटरनेशनल डेस्टिनेशन'च्या यादीत 'अव्वल'

Goa Tourism News: राज्यात कार्निवल आणि शिगमोत्सवाची तयारी सुरु आहे आणि या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे

Akshata Chhatre

पणजी: काही दिवसांपूर्वी गोव्यातील पर्यटनाच्या आकड्यांमध्ये घट झाली असल्याची माहिती समोर आली होती, मात्र सुरुवातीला कमी वाटणारा पर्यटकांचा गोव्याकडील ओढा आता वाढला आहे. सध्या राज्यात कार्निवल आणि शिगमोत्सवाची तयारी सुरु आहे आणि या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय हिंटरलँड देखील विदेशी पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करत आहे.

अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय बुकिंग पोर्टल एक्सपेडियाने जारी केलेल्या एका अहवालानुसार वर्ष २०२४ मध्ये गोव्याच्या पर्यटकांमध्ये घट झाली होती मात्र आता इंटरनेशनल डेस्टीनेशन्समध्ये गोव्याने आपले स्थान बळकट केले आहे. एक्सपेडियाच्या अहवालानुसार गोवा जानेवारी २०२५ पासून बराच चर्चेत आला आहे. गोव्यासाठी फ्लाइट बुकिंग करणाऱ्यांची संख्या गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत तब्बल आता १५५ टाक्यांनी वाढली आहे.

गोवा आंतराष्ट्रीय स्थरावर पर्यटनाची चांगली जाहिरात करतोय, आणि परिणामी गोवा परदेशी पर्यटकांमध्ये अधिक प्रसिद्ध होतोय. ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी दिलेल्या माहितीनुसार टुरिझम ब्रँडमुळे गोव्यात येणाऱ्या आंतराष्ट्रीय विमान बुकिंगच्या संख्येत वाढ झाली आहे.

आम्ही गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या कोन्टिटीवर नाही तर कॅलिटीवर लक्ष देतोय. गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करतोय आणि गोव्याच्या पर्यटन क्षेत्राबद्दल जागृती करण्याचा प्रयत्न करतोय असं पर्यटन मंत्री रोहन खवंटे म्हणाले आहेत.

काही दिवसांपूर्वी गोव्यातील पर्यटनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. सोशल मीडियावर गोव्याच्या पर्यटनाची बदनामी करणारे व्हिडीओ फिरत होते. काही पर्यटकांना मारहाण तसेच खुनाच्या बातम्या समोर येत होत्या मात्र आता समोर आलेल्या अहवालामुळे गोव्याच्या पर्यटनाचे चित्र सुधारत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT