Goa Tourism: गोमंतकीय संस्कृतीचा 'टोकियोत' Roadshow, जपानी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन खात्याचा पुढाकार

Goa tourism roadshow in Tokyo: गेल्या काही वर्षांत गोव्यामध्ये वेलनेस टुरिझम म्हणजेच आयुर्वेद, योग आणि सर्वांगीण आरोग्य सुधारणा करणाऱ्या केंद्रांची मागणी वाढली आहे.
Rohan Khaunte, Goa Tourism
Rohan Khaunte, Goa Tourism Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism Roadshow in Tokyo

पणजी: गोव्याची दोलायमान संस्कृती, अनोखे पर्यटन अनुभव आणि शाश्वत प्रवासाच्या संधींना चालना देण्यासाठी पर्यटन खात्याने सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी जपानच्या टोकियो शहरात एका विशेष पर्यटन रोड शोचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश जपानी पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करणे असून जपानी बाजारपेठेत गोव्याची उपस्थिती अधिक मजबूत करणे, हाही या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.

या रोड शोद्वारे गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील मुख्य वैशिष्ट्ये सादर केली जातील. यामध्ये शाश्वत आणि पुनरुत्पादक पर्यटन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शाश्वत पर्यटनाच्या अनुषंगाने पर्यावरणपूरक उपाय, स्थानिक समुदायांच्या सहभागातून राबवले जाणारे उपक्रम आणि सांस्कृतिक वारसा जतन करणाऱ्या अनुभवांवर भर दिला जाईल. गोव्याचे पारंपरिक उत्सव, हस्तकला आणि ऐतिहासिक स्थळांचे विशेष सादरीकरण या कार्यक्रमाचा भाग असेल.

पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक म्हणाले की, गोवा हे एक असे स्थळ आहे, जे संस्कृती, निसर्ग, वेलनेस आणि साहस यांचे उत्तम मिश्रण आहे. या रोड शोच्या माध्यमातून जबाबदार पर्यटनाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही जपानी प्रवाशांसोबत संबंध अधिक दृढ करण्यास आणि त्यांना गोव्याच्या अस्सल सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करण्यास उत्सुक आहोत.

Rohan Khaunte, Goa Tourism
Goa Tourism: गोव्यासाठी आनंदाची बातमी! पर्यटन हंगाम ठरला फायदेशीर, पर्यटकांची 'विक्रमी' संख्या; वाचा आकडेवारी

वेलनेस, साहसी पर्यटनाला चालना

गेल्या काही वर्षांत गोव्यामध्ये वेलनेस टुरिझम म्हणजेच आयुर्वेद, योग आणि सर्वांगीण आरोग्य सुधारणा करणाऱ्या केंद्रांची मागणी वाढली आहे. या रोड शोमध्ये गोव्याच्या वेलनेस रिट्रीट्स, योग केंद्रे आणि आयुर्वेदिक उपचारांचे प्रमोशन करण्यात येईल. तसेच, साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी गोव्यातील ट्रेकिंग ट्रेल्स, धबधबे, मसाले लागवड भ्रमंती, पक्षी निरीक्षण आणि इको-टुरिझम हॉटस्पॉट्स यांचा समावेश असेल.

गोवा हे जागतिक प्रवाशांसाठी नेहमीच पसंतीचे ठिकाण राहिले आहे. टोकियोत होणारा हा रोड शो जपानी ट्रॅव्हल ट्रेड उद्योगाशी संबंध प्रस्थापित करण्याची आणि गोव्याच्या पर्यटन क्षेत्राच्या विविध संधी सादर करण्याची एक उत्तम संधी आहे. यामध्ये शाश्वत पर्यटन आणि स्थानिक संस्कृतीच्या संवर्धनाला आम्ही प्राधान्य देत आहोत.

रोहन खंवटे, पर्यटन मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com