Goa Tourism: गोव्याच्या पर्यटन उद्योगाला नवीन उभारी; इको-टुरिझम रिसॉर्ट्स, होमस्टेसाठी मिळणार कर्ज, केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा

Jitin Prasada Goa visit: पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी लवकरच पर्यावरणपूरक पर्यटन रिसॉर्ट्स आणि होमस्टे यांसाठी कर्जसुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असं केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी सांगितलं.
Jitin Prasada Goa visit
Jitin Prasada Goa visitDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी ई-व्हिसा प्रक्रियेला अधिक सुलभ आणि वेगवान करण्यावर काम करत आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी दिली. या निर्णयामुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचं जितिन प्रसाद यांनी सांगितलं.

जितिन प्रसाद हे दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. आज (१३ फेब्रवारी ) पणजी येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्पात संपूर्ण भारतभर ५० पर्यटन स्थळांच्या विकासासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत प्रकल्प राबवले जाणार आहेत. यामध्ये गोवा महत्त्वाचा लाभार्थी ठरण्याची शक्यता आहे.

आपल्या देशाला भेट देऊ इच्छिणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी ई-व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोवा हे आमचे प्रमुख पर्यटनस्थळ आहे आणि या नवीन उपक्रमांमुळे त्याचे आकर्षण अधिक वाढणार आहे.

पर्यटन विकासाला चालना

पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांचा, ऐतिहासिक वारसास्थळांचा आणि निसर्गपर्यटन स्थळांचा पुनर्विकास होणार, असं जितिन प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी लवकरच पर्यावरणपूरक पर्यटन रिसॉर्ट्स आणि होमस्टे यांसाठी कर्जसुविधा उपलब्ध करून दिली जाईल. यासोबतच प्रमुख विमानतळे आणि आंतरराष्ट्रीय केंद्रांशी अधिक चांगली जोडणी निर्माण केली जाईल," अशी घोषणा जितिन प्रसाद यांनी यावेळी केली.

Jitin Prasada Goa visit
Goa Shopping Guide: गोव्याची खासियत! 'या' 7 वस्तू खरेदी केल्याशिवाय परत येऊ नका

मच्छीमारांसाठी उत्तम सुविधा

भारताच्या एकूण औषधनिर्मिती उत्पादनात १२% वाटा असलेल्या गोव्याच्या फार्मास्युटिकल क्षेत्राला विस्तारित उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) योजना आणि संशोधन व विकासासाठी (R&D) वाढीव निधी मिळणार आहे. या पाठबळामुळे गोवा एक अग्रगण्य फार्मा हब म्हणून अधिक मजबूत होईल.

गोव्यातील मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी ६ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत मासेमारी बंदरांचे आधुनिकीकरण, कोल्ड स्टोरेज आणि पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. या उपक्रमामुळे मच्छीमारांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध होतील आणि मत्स्य उद्योगाला नवा चालना मिळेल,' असं जितिन प्रसाद यांनी सांगितलं.

Jitin Prasada Goa visit
Famous Burger in Goa: गोव्यातील बेस्ट स्ट्रीट फूड; 'या' ठिकाणी मिळतो अप्रतिम बर्गर

उडाण योजनेच्या विस्तारामुळे प्रादेशिक जोडणी अधिक मजबूत होणार असून, गोव्याच्या विमानतळांना याचा मोठा फायदा होईल. यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि परवडणारा होईल.

खेलो इंडिया आणि फिट इंडिया कार्यक्रमांसाठी ३ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यामुळे गोव्यातील क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे, असं जितिन प्रसाद यांनी सांगितलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com