Rohan Khaunte On Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: पर्यटकांना गोवा सरकारची भेट! मनमानी भाडे आकारणाऱ्या टॅक्सीचालकांचं मीटर 'डाऊन', समितीचा प्रस्ताव

Goa Government Tourism Initiatives: पर्यटन क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी अनेक उपाययोजनांची रूपरेषा आखली आहे

Akshata Chhatre

Goa Tourism Development

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी (१४ जानेवारी) रोजी राज्य पर्यटन विकास मंडळाची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे उपस्थित होते. सध्या राज्यातील पर्यटनाला धरून अनेक वाद आणि चर्चा सुरु आहेत आणि म्हणूनच पर्यटन क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी अनेक उपाययोजनांची रूपरेषा आखली आहे.

टॅक्सी ॲक्शन एम्पॉवर कमिटी

पर्यटनाचे प्रश्न सोडवताना मुख्यमंत्र्यांनी एक खिडकी योजनेतून यावर तोडगा काढण्याचा विचार सुरू केला आहे, यामुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल आणि परिणामी पर्यटनाच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा महसूल निर्माण होईल. सध्या गोव्यात टॅक्सी चालक अधिक पैसे उकळत असल्याची तक्रार केली जातेय आणि यावर उपाय म्हणून राज्य पर्यटन विकास मंडळाने 'टॅक्सी ॲक्शन एम्पॉवर कमिटी' ची स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे यामुळे टॅक्सीच्या किमतीच्या समस्यांचे निराकरण होईल.

क्रूझ टर्मिनल्समध्ये सुधारणा

मंडळ अधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मदत करण्यासाठी गोव्यातील क्रूझ टर्मिनल्समध्ये सुधारणा करत आहेत.

गोवा हे क्रूझ आणि जहाजांमुळे पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे, त्यामुळे पर्यटनाला चालना देण्याचे आणि स्थानिक समुदायाला पाठिंबा देण्याचे मंडळाचे उद्दिष्ट आहे, ज्याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि विकासावर सकारात्मक परिणाम होईल.

डेस्टिनेशन वेडिंग

डेस्टिनेशन वेडिंगच्या बाबतीत देखील गोवा अव्वल स्थानी आहे, आणि यालाच आणखीन चालना मिळण्यासाठी पर्यटन खात्याला GCZMA कडून ब्लँकेट परवानगी मिळवून वेडिंग टुरिझम सुव्यवस्थित करायचेआहे.

यानंतर अर्जदारांना केवळ पर्यटन विभागाच्या ऑनलाइन सिंगल-विंडो प्लॅटफॉर्मद्वारे आवश्यक मंजूरी प्राप्त करता येणार आहे. तसेच सर्व अधिकार स्थानिक पंचायतींच्या नाही तर पर्यटन खात्याच्या हाती येतील.

जागतिक मोहिम

सध्या गोव्याच्या पर्यटनबद्दल अनेक प्रकारे चुकीची माहिती पसरवली जातेय, यावर एक ठोस उपाय म्हणून आणि गोव्यातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक मोहिम सुरू करण्याची योजना आखली आहे. यामधून जागतिक स्थरावर गोव्याच्या पर्यटनाचे प्रदर्शन व्हावे आणि अधिकाधिक पर्यटक गोव्याच्या दिशेने वळावे असा उद्देश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT