Goa Tourism: गोव्याचा पर्यटन व्‍यवसाय 24 टक्क्यांनी वाढला! मंत्री खंवटेनी केली आकडेवारी जाहीर; 1 कोटीहून जास्त पर्यटकांची भेट

Rohan Khaunte: एकदिवसीय पर्यटन स्टेकहोल्डर संमेलनात गोव्याच्या पर्यटन क्षेत्राच्या प्रगतीचा अहवाल सादर करत सकारात्मक बदल आणि आव्हानांवर चर्चा करण्यात आली.
Rohan Khaunte About Goa Tourism
Rohan KhaunteDainik Gomantak
Published on
Updated on

Goa tourism statistics 2024

पणजी: २०२४ मध्ये गोव्याच्‍या पर्यटन व्‍यवसायात २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२३च्या तुलनेत देशी पर्यटकांची संख्या २४ टक्क्यांनी तर विदेशी पर्यटकांची संख्‍या ३ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. पर्यटन विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या १ कोटी ४ लाखांहून अधिक असल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. ३५ टक्के रोजगार निर्मिती झाल्‍याचे ते म्‍हणाले.

आज सोमवारी आयोजित एकदिवसीय पर्यटन स्टेकहोल्डर संमेलनात गोव्याच्या पर्यटन क्षेत्राच्या प्रगतीचा अहवाल सादर करत सकारात्मक बदल आणि आव्हानांवर चर्चा करण्यात आली. पर्यटन क्षेत्राशी निगडित महत्त्वाच्या आकडेवारीसह विकासाच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला.

पर्यटन संचालक सुनील अंचिपका यांनी सांगितले की, सोशल मीडियावर गोव्याबाबत बदनामीकारक आणि खोटी माहिती पसरविली जात आहे. गोव्याचे खरे चित्र लोकांसमोर मांडण्याची गरज असल्याने आम्ही ही माहिती देत आहोत. तसेच अशा समस्यांवर उपाययोजना देखील केल्या जातील.

डिसेंबरमध्‍ये दिवसाला २०० विमाने आली

राज्‍याच्‍या पर्यटनावर करण्यात येणाऱ्या नकारात्मक टीकेला उत्तर देताना पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले की, गोव्याचे पर्यटन चांगल्या स्थितीत आहे. डिसेंबर २०२४ मध्ये पर्यटनात ५४ टक्के वाढ झाली असून या महिन्यात दररोज २०० विमानांचे आगमन गोव्यात झाले.

टूलकिट, मारहाणीबाबत बोलणे टाळले

राज्यात सध्‍या गाजत असलेले ‘टूल-किट’ प्रकरण आणि कळंगुट येथे पर्यटकांना झालेल्या

मारहाणीबद्दल विचारले असता पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी त्यावर बोलणे टाळले.

Rohan Khaunte About Goa Tourism
Goa Tourism: थोडा है, थोडे की जरुरत है! गोव्याच्या पर्यटनावर कोल्हापुरच्या पर्यटकाने मांडले रोखठोक मत

‘दाबोळी’वरील प्रवाशांत २७ टक्क्यांनी वाढ

दाबोळी विमानतळ बंद होणार किंवा तो ‘घोस्ट एअरपोर्ट’ असल्‍याचे फेटाळून लावत २०२४ मध्ये या विमानतळावर २७ टक्के प्रवाशांची वाढ झाल्याचे मंत्री खंवटे यांनी सांगितले. विमानतळ आणि चार्टर कंपन्यांसोबत काम करून आणखी सुधारणा करण्याचा संकल्प देखील त्‍यांनी व्यक्त केला.

Rohan Khaunte About Goa Tourism
Goa Tourism: गोव्यात 'पर्यटकांसाठी' सरसावले पोलीस! किनाऱ्यांवर विशेष पथके तैनात; शॅक्स, हॉटेलवर राहणार बारीक लक्ष

खंवटे यांनी सांगितले की, गोवा पर्यटन क्षेत्रामुळे ३५ टक्के रोजगार निर्मिती झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ६ हजार हॉटेल्सची वाढ झाली असून अनेक हॉटेल्समध्ये १०० टक्के बुकिंग झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com