Destination Wedding साठी 'या' ठिकाणाला सर्वाधिक पसंती; गोवा, जयपूरला टाकले मागे

विवाहसोहळ्यांसाठी अनेक क्रुझ बूक
Goa In Destination Wedding
Goa In Destination WeddingDainik Gomantak
Published on
Updated on

Goa In Destination Wedding: देशात बॉलिवूडपासून सुरू झालेली डेस्टिनेशन वेडिंगची क्रेझ आता इतर क्षेत्रातील सेलिब्रिटी आणि अगदी सर्वसामान्यांपर्यंतही पोहोचली आहे.

देशात डेस्टिनेशन वेडिंगसाठी आत्तापर्यंत गोवा, जयपूर, उदयपूर या ठिकाणांना सर्वाधिक पसंती होती. तथापि, आता या दोन्ही ठिकाणांना मागे टाकत वाराणसी हे ठिकाण डेस्टिनेशन वेडिंगसाठी सर्वाधिक आवडीचे बनले आहे.

काशी, बनारस या नावांनी ओळखल्या जात असलेल्या वाराणसीतील काशी घाट, गंगा आरतीमुळे डेस्टिनेशन वेडिंगला रॉयल लूक मिळत आहे. केवळ याच कारणांमुळे अनेक विवाहसोहळे येथे होत आहेत.

विशेष म्हणजे, अनेक विवाहसोहळ्यांसाठी क्रूझ बुक करण्यात आल्या आहेत. काशीच्या नयनरम्य गंगा घाटांच्या वैभवासह गंगा आरतीसह विवाहसोहळा शाही बनविण्याची तयारी कुटूंबे करत आहेत.

सध्या काशी हे डेस्टिनेशन वेडिंगसाठी देशातील सर्वात आवडते ठिकाण बनले आहे. जयपूर, उदयपूर आणि गोवा ही स्थळे त्यानंतर येतात. तथापि, आता वाराणसीतच सात फेऱ्यांसाठी सर्वाधिक पसंती मिळते आहे.

Goa In Destination Wedding
Goa Crime: फोंड्यात पोलिसांचा छापा; एक किलो गांजा जप्त, एकाला अटक

त्यासाठी नोव्हेंबरपासून येथील हॉटेल्स, लॉन, रिसॉर्ट्स बुक करण्यात आली आहेत. वाराणसी शहरातील पंचतारांकित हॉटेल्समध्ये जवळपास 80 टक्के बुकिंग झाले आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश बुकिंग्ज फक्त लग्न समारंभांसाठीच झालेली आहेत.

हिंदी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. इव्हेंट कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, 23 नोव्हेंबर ते 13 डिसेंबरदरम्यान जवळपास 50 डेस्टिनेशन वेडिंग्जसाठी हॉटेल्समध्ये बुकिंग करण्यात आले आहे. यामध्ये कॅन्टोन्मेंटपासून नदी घाटाच्या बाजूला असलेल्या हॉटेल्सना अधिक पसंती दिली जात आहे.

ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे प्रवीण मेहता म्हणाले की, जयपूरला मागे टाकून लोक रॉयल वेडिंगसाठी काशीला प्राधान्य देत आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर 2023 दरम्यान डेस्टिनेशन वेडिंगसाठी दिल्ली आणि मुंबईतून सुमारे 15 चार्टर्ड विमाने बुक करण्यात आली आहेत.

यावरूनही त्याचा अंदाज लावता येतो. सुमारे सहा ते सात लग्नांचा खर्च कोट्यवधींच्या घरात असल्याचा अंदाज आहे.

Goa In Destination Wedding
Goa Politics: ‘राजकीय भाष्य केल्याने सभापतिपदाची विटंबना’; प्रभाकर तिंबले

काशी घाट आणि गंगा आरती थीमवर आधारित विवाहसोहळे येथे होत आहेत. त्यामुळे विवाहांना शाही रूप मिळत आहे. बहुतांश विवाहसोहळ्यांची थीम घाट आणि गंगा आरती अशीच आहे. गंगा आरतीवेळी वधुची स्टेजवर एंट्री... अशा पद्धतीने लग्ने होत आहेत.

वाराणसी पर्यटनाचे चांगले डेस्टिनेशन बनले आहे. ऐतिहासिक वारसा, मंदिरे, काशी विश्वनाथ धाम, गंगेचा किनारा, क्रूझ, घाटाजवळील राजेशाही हॉटेल्स यामुळे तरुणाई लग्नासाठी काशीकडे आकर्षित होत आहे, असे सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com