Goa Tourism: "गोवा को बस हाइप करके रखा हैं!" पर्यटकाच्या व्हिडिओवर स्थानिकांचा संताप

Social Media Influencer Goa Video:गोव्याचे पर्यटन हे अजिबातच योग्य नाही, किंबहुना कोणीही गोव्याला पर्यटनासाठी येऊ नये असे वक्तव्य केले आहे
Goa Tourism| Goa Tourism News |Goa Tourism News
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याबद्दल सध्या पर्यटकांच्या मनात अनेक शंका-कुशंका निर्माण झाल्या आहेत. गोवा हे ठिकाण पर्यटकांसाठी योग्य नाही, सुरक्षित नाही अशा अशा चर्चा सोशल मीडियावर बऱ्यापैकी रंगल्या असतानाच गोव्यातून एका पर्यटकाचा व्हिडीओ पुन्हा गाजतोय. यामध्ये त्याने गोव्याचे पर्यटन हे अजिबातच योग्य नाही, किंबहुना कोणीही गोव्याला पर्यटनासाठी येऊ नये असे वक्तव्य केले आहे.

हा पर्यटकाचा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आला असून नेटकरी यावर मत व्यक्त करत आहेत. काहीजणं त्याचं समर्थन करतायत तर दुसऱ्या बाजूने काही लोकं त्याच्या विरुद्ध बोलताना दिसतायत. या व्हिडीओमध्ये तो म्हणतोय की गोव्याला कुणीही येऊ नये, इथे फसवेगिरीचे अनेक प्रकार घडतात. तो म्हणतोय की मी माझ्या अनुभवावरून सांगतोय की ही जागा पर्यटकांसाठी नाही.

त्याने सांगितलेल्या अनुभवानुसार बुकिंग डॉट कॉमवरून त्याने गोव्यात एक अपार्टमेंटचं बुकिंग केलं होतं, मात्र गोव्यात आल्यानंतर त्याला समजलं की अशा नावाचं कुठलंही अपार्टमेंट इथे नाहीच. लोकांनी उगाच चढवून ठेवलंय, प्रत्यक्षात मात्र इथे बघण्यासारखं काहीही नाही.

Goa Tourism| Goa Tourism News |Goa Tourism News
Goa Tourism: गोव्यात 'पर्यटकांसाठी' सरसावले पोलीस! किनाऱ्यांवर विशेष पथके तैनात; शॅक्स, हॉटेलवर राहणार बारीक लक्ष

गोव्यातील लोकांकडून मात्र या व्हिडीओवर संताप व्यक्त केला जातोय. अद्याप पर्यटन विभागाने यावर काही मत व्यक्त केलेलं नाहीये, मात्र पर्यटन विभाग आता काय भूमिका घेतोय हे पाहावं लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com