Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte: "मी काही शेरलॉक होम्स नाही" फरार सुलेमान खान प्रकरणावर रोहन खंवटेंचं सडेतोड उत्तर

Suleman Khan Escape Case: लोकांनी सोशल मीडियावर सुरु असलेल्या खोट्या चर्चांना बळी पडू नये

Akshata Chhatre

Rohan Khaunte on Suleman Khan Escape

म्हापसा: गोवा मुक्ति दिवसाच्या निमित्ताने म्हापसा येथील मामलेदार कार्यालयात ध्वजारोहण करण्यासाठी पर्वरीचे आमदार आणि राज्याचे पर्यटनमंत्री रोहन रोहन खंवटे उपस्थित होते. धवजरोहणाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना गोव्यातील काही ठळक घटनांबाबत प्रश्न विचारण्यात आले. या विशेष मुद्यांमध्ये सुलेमान खान पलायन तसेच कॅश फॉर जॉब स्कॅम यांसारख्या विषयांचा समावेश होता.

मंत्री रोहन खवंटे यांनी सुद्धा सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली. गुन्हा अन्वेषण विभागाच्या तावडीतून एखादा भयंकर कैदी सुटून जाण्यावर मत मांडायला सांगताच रोहन खंवटे म्हणाले की आवश्यक असलेली कारवाई मुख्यामंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आधीच केलेली आहे. आता सुलेमान खान याला अटक झाल्यानंतरच एकूण प्रकरणामागचा खरा सूत्रधार कोण होता यावरून पडदा उठणार आहे.

गोवा पोलीस होईल तेवढ्या जलद गतीने सुलेमानला बेड्या ठोकण्याच्या प्रयत्नात आहेच, मात्र दरम्यान कोण काय बोलतात किंवा काय करतायत हे महत्वाचं नाही. या प्रकरणात कदाचित काही राजकारणी लोकांचा किंवा पोलिसांचा संबंध असू शकतो अशा देखील चर्चा उठत आहेत यावर मत व्यक्त करताना "मी काही शेरलॉक होम्स किंवा डिटेक्टिव्ह नाही." गोव्यात अशा गोष्टी मुळीच खपवून घेतल्या जाणार नाहीत त्यामुळे याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याची माहिती रोहन खंवटे यांनी दिली.

राज्यात सुरु झालेल्या नवीन मुद्यामुळे जुने गुन्हे दबून जातात, कॅश फॉर जॉब सारख्या गंभीर गुन्ह्यावरून लक्ष हटलंय की काय या प्रश्नाला उत्तर देताना रोहन खंवटे म्हणाले की मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख नेते आहेत आणि ते वेळोवेळी यावर समाधानकारक उत्तरं देत असतात, त्यामुळे लोकांनी सोशल मीडियावर सुरु असलेल्या खोट्या चर्चांना बळी पडू नये. संपूर्ण घटना समजून त्यानंतरच त्यावर भाष्य करावं आणि सुरु असलेल्या राजकारणाला खरं मानून चालू नये असंही पर्यटनमंत्री म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT