Rohan Khaunte: २० कलमी घरांबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हे स्वागतार्ह पाऊल

Socorro 20 Point Colony: वसाहतीतील घरांबाबत कसा तोडगा काढता येईल यावर विचार करण्याचे उत्तर मागच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी दिले होते
Socorro 20 Point Colony: वसाहतीतील घरांबाबत कसा तोडगा काढता येईल यावर विचार करण्याचे उत्तर मागच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी दिले होते
Rohan KhaunteDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: २० कलमी वसाहतीतील घरांच्या बांधकाम मुद्यावर कायदेशीर बाबी पडताळून योग्य निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेले आश्वासन हे स्वागतार्ह पाऊल असल्याची प्रतिक्रिया पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आज दिली.

संध्याकाळी सचिवालयातील त्यांच्या चेंबरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अलीकडेच विरोधी काँग्रेस पक्ष समर्थकांनी राजकीय सूडबुध्दीने उच्च न्यायालयात सुकूरच्या २० कलमी वसाहत प्रकरणी ६४ घरमालकांविरुध्द तक्रार केली होती. त्यामुळे त्यांच्यासह मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांची काही दिवसांपूर्वीच भेट घेऊन मी सामान्यांना न्याय देण्याची मागणी केली होती, असे खंवटे म्हणाले.

२० कलमी वसाहतीतील घरांबाबत कसा तोडगा काढता येईल, यावर विचार करण्याचे उत्तर मागच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार त्यांचे आजचे निवेदन हे आशादायक वाटते. सर्वसामान्यांच्या हितासाठीच राज्य सरकार कार्य करत असल्याचे आजच्या त्यांच्या निवेदनामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे खंवटे यांनी सांगितले.

Socorro 20 Point Colony: वसाहतीतील घरांबाबत कसा तोडगा काढता येईल यावर विचार करण्याचे उत्तर मागच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी दिले होते
Socorro Sabha : सुकूर ग्रामसभेत घराच्या कारवाईवरील चर्चा रंगली

काँग्रेस समर्थकांच्या कृतीचा निषेध

२० कलमी वसाहतीतील लोकांना न्यायालयात खेचण्याच्या काँग्रेस समर्थकांच्या कृतीचा खंवटे यांनी निषेध केला. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनामुळे या वसाहतीतील सामान्य लोकांना दिलासा मिळेल, ही समाधानाची बाब असल्याचे ते म्हणाले. स्वत: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरांवर दगडफेक करू नये असा खोचक सल्लाही त्यांनी काँग्रेस समर्थक राजकारण्यांना दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com