Rohan Khaunte Remember Parrikar: सर्जिकल स्‍ट्राईक, लष्‍कराचे आधुनिकीकरण; खंवटेंनी जागवल्या मनोहरभाईंच्या आठवणी

Manohar Parrikar Birth Anniversary: गोव्‍याचे मुख्‍यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि देशाचे संरक्षणमंत्री म्‍हणून पर्रीकर यांनी केलेली कामगिरी आजही लोकांच्‍या स्‍म‍रणात आहे.
Rohan Khaunte, Manohar Parrikar
Rohan Khaunte, Manohar ParrikarX
Published on
Updated on

Manohar Parrikar Birth Anniversary

पणजी: मनोहर पर्रीकर हे राजकारणातील दूरदृष्‍टी असलेले लोकप्रिय नेते होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यामुळे जनतेच्‍या मनात आजही ते कायम आहेत. प्रशासक कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्‍हणजे मनोहरभाई.

गोव्‍याचे मुख्‍यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि देशाचे संरक्षणमंत्री म्‍हणून पर्रीकर यांनी केलेली कामगिरी आजही लोकांच्‍या स्‍म‍रणात आहे. संरक्षणमंत्री म्‍हणून लष्‍कराचे आधुनिकीकरण आणि शत्रू राष्‍ट्र पाकिस्‍तानवरील सर्जिकल स्‍ट्राईक हे त्‍यांचे निर्णय अतुलनीय होते. त्‍यांच्‍या मुख्‍यमंत्रिपदाच्‍या कारकिर्दीत पर्वरीचा अपक्ष आमदार असताना माझी मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखालील सरकारात सुमारे अडीच वर्षे श्रम आणि रोजगार तसेच माहिती-तंत्रज्ञानमंत्री म्‍हणून काम करण्‍याची मला संधी मिळाली हे मी माझे भाग्‍य समजतो. त्‍यांच्‍या कुशल नेतृत्‍वाखाली राजकारणातील बारकावे शिकण्‍याची, अनुभवण्‍याची मला संधी मिळाली. त्‍यांच्‍याकडील कौशल्‍य आणि राजकारणाचा दांडगा अनुभव यातून एक राजकारणी म्‍हणून मला खूप काही शिकता आले, अनुभवता आले.

Rohan Khaunte, Manohar Parrikar
Vijay Sardesai Remember Parrikar: विरोधक ते सरकारमधील सोबती; पर्रीकरांना पाठिंबा का दिला? विजय सरदेसाईंनी सांगितले कारण

एखादे विकासकाम हाती घेतल्‍यानंतर ते धसास लावण्‍यापर्यंतची त्‍यांची जिद्द, सचोटी आणि सर्वसामान्‍यांसाठी काम करण्‍याप्रति तळमळ या गोष्‍टी मला माझ्‍या राजकीय कारकिर्दीत बरेच काही शिकवून गेल्‍या. अनेकांना भाईंचा स्‍वभाव तापट वाटायचा. पण त्‍यांच्‍या जवळून संपर्कात आलेली व्‍यक्ती मनोहरभाईंकडून काही तरी प्रेरणाच घ्‍यायची. यापैकी मी एक होतो. माझ्‍या राजकीय कारकिर्दीत मी राजकारणातील त्‍यांचे कसब, त्‍यांची नीती, त्‍यांची तळमळ हे सारे काही जवळून पाहिले आणि अनुभवले.

Rohan Khaunte, Manohar Parrikar
Manohar Parrikar Life Journey : उत्तमा आत्मना ख्याताः ! RSS ते गोव्याचे मुख्यमंत्री, पर्रीकरांचा जीवनप्रवास

आपल्‍या मुख्‍यमंत्रिपदाच्‍या कारकिर्दीत पर्रीकर यांनी राज्‍यात पायाभूत सुविधा, राज्‍याचा आर्थिक विकास तसेच आरोग्‍य व्‍यवस्‍थेचाही कायापालट केला. माहिती तंत्रज्ञान, नव्‍या युगाची ओळख त्‍यांनी त्‍यावेळीच जाणून तशी पावले उचलली. त्‍याची फळे आज युवा पिढीला मिळत आहेत. एखादा कठीण निर्णय देखील झटपट घेण्‍याचा त्‍यांचे गुणवैशिष्‍ट्य महत्त्‍वपूर्ण होते. एकंदरीत मी असे म्‍हणेन की माझ्‍या राजकीय कारकिर्दीला मनोहरभाईंमुळेच एक वेगळी दिशा मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com