Goa state|
Goa state| Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism Advisory: दारु, सेल्फी, टॅक्सीबाबत गोव्यातील नियम बदलले, 50,000 दंडाची तरतूद; जाणून घ्या नवे 'नियम'

Rajat Sawant

Goa Tourism: गोवा पर्यटन खात्याने अनेक गोष्टींवर बंदी घालत नव्या सल्लादर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्यात पर्यटकांच्या परवानगीशिवाय सूर्यस्नान करताना किंवा समुद्रात पोहतानाचे फोटो क्लिक करणे तसेच सेल्फी घेणे यासह अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.

पर्यटन खात्याने गुरुवारी नवीन सल्लादर्शक सूचना जारी केल्या आहेत. विभागाने म्हटले आहे की, सूर्यस्नान करताना किंवा समुद्रात पोहताना पर्यटकांच्या किंवा अनोळखी व्यक्तींच्या परवानगीशिवाय सेल्फी आणि छायाचित्रे घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असे सल्लादर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. तसेच समुद्रातील खडकांवर इत्यादी धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

वारसा स्थळांना किंवा स्मारकांना नुकसान न करण्याचा सल्लाही विभागाने दिला आहे. बेकायदेशीर खाजगी टॅक्सी भाड्याने घेऊ नका. जादा आकारणी टाळण्यासाठी मीटरच्या भाड्याचा आग्रह करा. पर्यटन विभागाकडे रीतसर नोंदणी केलेलीच हॉटेल्स, व्हिला पर्यटकांनी बुक करावेत

राज्यातील किनाऱ्यांवर तसेच खुल्या भागात दारू पिण्यावर बंदी आहे आणि तसे आढळून आल्यास तो दंडनीय गुन्हा आहे. शॅक्स, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स इत्यादी कायदेशीररित्या परवाना असलेल्या ठिकाणी दारूचे सेवन करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तसेच खुल्या भागात अन्न शिजवण्यास बंदी आहे असे आढळून आल्यास कारवाई म्हणून स्वयंपाकाच्या वस्तू जप्त केल्या जाऊ शकतात तसेच 50 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

विभागाने असे म्हटले आहे की, परिवहन विभागाकडे कायदेशीररित्या नोंदणी आणि वैध परमिट नसलेली खाजगी वाहने, दुचाकी भाड्याने घेणे टाळावे याबाबत पर्यटकांना सावध केले जात आहे.

वॉटरस्पोर्ट्स आणि रिव्हर क्रूझ बुकिंग करताना नोंदणीकृत ट्रॅव्हल एजंट किंवा नोंदणीकृत ऑनलाइन पोर्टलवरून बुक कराव्यात असे नव्या सल्लादर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Netravali: कथित शिकार प्रकरणी कदंबच्या 16 कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; महामंडळ दोन दिवसांत घेणार कारवाईचा निर्णय

New Education Policy In Goa: गोव्यात चार वर्षात नवे शैक्षणिक धोरण लागू होणार; यंदा नववीपासून तर पुढील वर्षी...

Konkan Railway Fine Collection: फुकट्यांना कोकण रेल्वेचा दणका, एप्रिलमध्ये 2.70 कोटी दंड वसूल

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

SCROLL FOR NEXT