Drinking Facts : काय सांगता! दारू पिल्याने वाढतो इंग्लिश बोलण्याचा कॉन्फिडंस; रिसर्चनुसार...

अल्कोहोलमुळे मूत्रपिंड, यकृत ते हृदयाचे नुकसान होते. पण काही गोष्टींमध्ये अल्कोहोलचे फायदेही आहेत.
Drinking Benefits | Drinking Facts
Drinking Benefits | Drinking Facts Dainik Gomantak
Published on
Updated on

Drinking Facts : अल्कोहोलमुळे मूत्रपिंड, यकृत ते हृदयाचे नुकसान होते. पण काही गोष्टींमध्ये अल्कोहोलचे फायदेही आहेत.

एका नव्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, जर एखाद्या व्यक्तीने दारूचा थोडासा घोटही प्यायला घेतला तर त्यानंतर तो दुसऱ्या भाषेत किंवा परदेशी भाषेत बोलू लागतो.

जरी त्याला ही भाषा आधीपासूनच कमी प्रमाणात माहित असेल तरीही. भारतात ती इंग्रजी भाषा असू शकते. म्हणजे जे लोक आपली मातृभाषा हिंदी बोलतात, त्यांनी दारू प्यायली तर नशा चढल्यावर ते अस्खलित इंग्रजी बोलू लागतात.

Drinking Benefits | Drinking Facts
Health Tips: शांत झोप हवीय? हे नियम लक्षात ठेवाच ...

हा अभ्यास जर्नल ऑफ सायकोफार्माकोलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे. लिव्हरपूल विद्यापीठ, मास्ट्रिच विद्यापीठ आणि किंग्ज कॉलेज लंडनच्या संशोधकांनी संयुक्तपणे हा अभ्यास केला आहे.

अभ्यासात असे आढळून आले की दारू प्यायल्यानंतर लोकांचे दुसऱ्या भाषेतील कौशल्य सुधारते आणि ते ती भाषा लवकर बोलू लागतात.

  • दारूमुळे आत्मविश्वासही वाढतो

सायन्सडेलीमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, इंग्रजी किंवा परदेशी भाषा बोलण्यासाठी बौद्धिक क्षमतेची जाणीव असणे आवश्यक आहे, हे आपल्याला माहीत आहे.

अशा स्थितीत दारूमुळे बौद्धिक क्षमता अधिक बिघडते असे आपण समजतो, परंतु अभ्यासात उलट परिणाम समोर आला आहे.

अभ्यासात असे दिसून आले आहे की अल्कोहोलमुळे आत्मविश्वास अनेक पटींनी वाढतो. यासोबतच ही सामाजिक चिंता, म्हणजेच अनेकांना पाहिल्यानंतर निर्माण होणारी अस्वस्थताही निघून जाते. या गोष्टींच्या प्रभावामुळे, जेव्हा इतर लोकांशी संभाषण होते, तेव्हा दुसरी भाषा बोलण्याची क्षमता देखील वाढते.

नेदरलँडमधील काही जर्मन मातृभाषेतील लोकांवर संशोधकांनी याची चाचणी केली. त्यासाठी त्यांनी या लोकांना अल्प प्रमाणात दारू दिली. हे लोक डच विद्यापीठात शिकत होते. सर्व जर्मन बोलत होते आणि अलीकडेच डच शिकत होते.

त्यांच्यासोबत काही डच लोक बसले होते जे दारू पीत नव्हते. आता या लोकांमध्ये संवाद सुरू झाला. संशोधकांनी सर्वांमधील संवाद रेकॉर्ड केला.

जेव्हा संभाषण झाले तेव्हा जर्मन भाषक, जो अजूनही डच शिकत होता, डच लोकांशी अस्खलित डचमध्ये बोलू लागला. नंतर या लोकांना डच बोलण्यावर रेट करण्यास सांगितले गेले. या सर्व लोकांना त्यांच्याच डचबद्दल आश्चर्य वाटले. अशा प्रकारे त्यांची डच बोलण्याची क्षमता वाढली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com