Tiracol  Dainik Gomantak
गोवा

Goa Tiracol News: 'गोल्फ कोर्स'चे भूत काही मानगुटीवरून उतरेना..!

Tiracol News: 2013 पासून येथील लोकांचा या गोल्फ कोर्सविरोधात न्यायालयीन लढा सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Tiracol News: गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील तेरेखोल गावातील प्रस्तावित गोल्फ कोर्सचे भूत अद्याप नदीपलीकडील चार वाड्यांवरील ग्रामस्थांच्या मानगुटीवरून कधी उतरणार, हे कळत नाही. 2013 पासून येथील लोकांचा या गोल्फ कोर्सविरोधात न्यायालयीन लढा सुरू आहे.

उच्च न्यायालयाने त्याला सोमवारी (दि. 26) स्थगिती दिली आहे. जोपर्यंत येथील कोर्सची जागा पूर्णतः ग्रामस्थांच्या ताब्यात मिळत नाही आणि येथील लोकांच्या नावावर घरे होत नाहीत, तोपर्यंत येथील लोकांचा लढा देण्याचा इरादा त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसून येतो.

2007 मध्ये दिल्लीच्या लिडिंग हॉटेलने येथील जमीन खरेदी केली होती. त्यानंतर 2013 साली या प्रकल्पाला गती मिळाली. त्यावेळी दिल्लीच्या लिडिंग हॉटेल्सने राज्य सरकारकडे जानेवारी 2013 मध्ये परवानगी मागितली होती. त्यानंतर सरकारने त्याला परवानगीही दिली होती.

सुमारे 13.85 लाख चौरस मीटर जागेपैकी 12.85 चौ. मी. जागा ही विकासासाठी वापरली जाणार होती, त्यात गोल्फ कोर्सचा समावेश होता. परंतु येथील ग्रामस्थांनी सुरुवातीपासून याविरोधात लढा सुरू केला तो अद्याप कायम आहे.

लिडिंग हॉटेलसाठी त्यावेळी तेरेखोल नदीवर 70 कोटी रुपये खर्चून पूल उभारला जाणार होता. परंतु अर्धवट स्थितीत तो राहिला; कारण येथील लोकांना अजिबात विश्‍वासात न घेता पुलाचे काम सुरू झाले होते. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळामार्फत या पुलाचे काम होणार होते. ज्यावेळी लोक येथे येत, त्यावेळी आम्ही विचारणा करायला गेल्यास ते काहीही न सांगता निघून जात.

पुलावरून मार्ग थेट लिडिंग हॉटेलचा जागेत जाणार होता; पण लोकांनी विरोध केल्याने तो होऊ शकला नाही. येथील वाड्यावरील लोकांना सरकारी नोकऱ्याही दिल्या गेल्या नाहीत, शिवाय कोणता रोजगारही उपलब्ध करून दिलेला नाही, असे मेंडिस पोटतिडकीने सांगत होते. गोवा फाऊंडेशनने या गोल्फ कोर्सविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, असे ते म्हणतात.

पोर्तुगीज काळात काजू फेणी काढण्याचा येथील ग्रामस्थांचा मोठा व्यवसाय आता मोजक्याच घरांत सुरू आहे. काजू व इतर शेती व्यवसायावर या चार वाड्यांवरील लोकांचा चरितार्थ चालतोय. सुमारे अडीचशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या वाड्यावरील लोकांचा गोल्फ कोर्सला सुरुवातीपासून विरोध आहे.

वीज महाराष्ट्राची, बिल गोव्यात

या वाड्यांवर वीज मिळते ते महाराष्ट्र राज्याची आणि बिल भरावे लागते ते गोवा सरकारकडे. कागदोपत्री काही व्यवहार असले तर फेरीबोटीतून येऊन तेरेखोल गाव किंवा पेडणे तालुक्यात करावे लागतात. तेरेखोलमधून या वाड्यांवर ये-जा करण्यासाठी फेरीबोट हे साधन आहे.

शिरोड्याचा पूल असला तरी वळसा घालून याठिकाणी येण्यासाठी सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर अंतर कापावे लागते. या वाड्यांवर ख्रिश्‍चनबहुल समाज वास्तव्यास आहे. सध्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून काहीजणांनी दारूची दुकाने, हॉटेल्स थाटली आहेत. तेरेखोल किल्ल्यावर जाणारा पर्यटक हा या दुकानांचा ग्राहक.

काजू फेणी व्यवसायावर गदा

या गोल्फ कोर्सच्या ठिकाणी असलेल्या काजूच्या बागांवर येथील लोक पारंपरिक फेणीचा व्यवसाय चालवतात. पूर्वी घरोघरी काजू फेणी काढली जायची. आता काही मोजक्याच ठिकाणी काजू फेणी काढली जाते. हा प्रकल्प अस्तित्वात आला तर आहे ती जमीनही संपुष्टात येईल, असे स्थानिक रहिवासी फ्रान्सिस रॉड्रिग्स यांनी सांगितले.

सरकार आमच्या विरोधात का?

या वाड्यावर अडीचशेच्या आसपास लोकसंख्या आहे. वयलो वाडो, रमण वाडो, सकयलो वाडो आणि मधलो वाडो अशा चारही वाड्यांवर घरे विस्तारलेली आहेत. गोल्फ कोर्सला विरोध करणाऱ्यांपैकी तिघे वयोवृद्ध हयात नाहीत. त्यांनी शेवटच्या श्‍वासापर्यंत गोल्फ कोर्सला विरोध दर्शविला. सरकार आमच्याविरोधात का वागते, हे माहीत नाही. आम्हाला विश्‍वासात न घेताच गोल्फ कोर्सचा घाट घातला गेला होता, तो आम्ही हाणून पाडला, असे सेंट ॲन्थनी कुळ मुंडकार असोसिएशनचे कोषाध्यक्ष ॲन्थनी मेंडिस म्हणाले.

12 सुरक्षा रक्षकांचा पहारा: लिडिंग हॉटेल्सच्या त्या प्रस्तावित गोल्फ कोर्सकडे जाणाऱ्या मार्गावर खासगी कंपनीचे सुरक्षा रक्षक नेमले आहेत. महाराष्ट्र पोलिस स्थानकाला लागूनच असलेल्या या ठिकाणी लोखंडी आडवा खांब प्रवेशद्वाराची भूमिका बजावत आहे. दिवसभर सहा आणि रात्रीचे सहा असे बारा सुरक्षा रक्षक या कंपनीसाठी काम करत आहेत.

गोवा सरकार ‘हर घर जल’ योजनेसाठी पंतप्रधानांकडून पाठ थोपटवून घेत आहे. परंतु या वाड्यांवर आजही पाण्यासाठी वणवण आहे. तेथे पाच-सहा पाण्याच्या मोठ्या टाक्या ठेवाव्या लागतात. पावसाळ्यात कुपनलिकांना पाणी येते, परंतु उन्हाळ्यात पूर्णपणे टँकरवर लोक अवलंबून असतात. बाजारासाठीही लोकांना शिरोड्याला जावे लागते.

शिरोडा जवळ असल्याने या वाड्याचे आर्थिक व्यवहार शिरोड्यातच चालतात. निवडणुका आल्या की आश्‍वासने मिळतात. गोव्यातून राज्यात वीज आणण्याचे काम सुरू झाले आहे, ते लवकर होईल अशी आशा आहे. पण पाण्याचा प्रश्‍न कधी सुटणार, ही चिंता सतावते, असे मेंडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT