VIDEO: गोव्यात रशियन कुटुंबाकडून बेकायदेशीर 'टॅक्सी व्यवसाय'; यांना कोणाचा 'आशीर्वाद'? स्थानिकांचा सवाल

Morjim: गोव्यातील मोरजी परिसरात परदेशी कुंटूबाकडून बेकायदेशीररीत्या व्यवसाय सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला.
Illegal Russian Tour & Travels
Illegal Russian Tour & TravelsDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील मोरजी परिसरात परदेशी कुंटूबाकडून बेकायदेशीररीत्या व्यवसाय सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटक म्हणून आलेल्या काही रशियन कुंटूबानं गेल्या दोन वर्षांपासून बेकायदेशीररीत्या हा व्यवसाय सुरू ठेवल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे गोव्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गोव्याबाहेरून येणारे लोक विविध व्यवसाय करत असताना आता देशाबाहेरून आलेले नागरिक देखील कायद्याला बगल देत धंदे करत असल्याचे चित्र आहे. या प्रकरणाबाबत यापूर्वीच पोलिस, पंचायत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या असल्या तरीही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.

Illegal Russian Tour & Travels
Goa Politics: 'सरदेसाईंसारखा सिंह माझ्या पाठीशी'! खोर्लीसाठी गोवा फॉरवर्डचा उमेदवार जाहीर; ‘डबल इंजिन’कडून लूट झाल्याचे आरोप

दरम्यान, मोरजी येथील रहिवाशांनी अखेर पुन्हा एकदा संबंधित रशियन नागरिकांविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. बेकायदेशीर व्यवसायामुळे स्थानिकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे तातडीने चौकशी करून कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

“गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना प्रशासनाने कारवाई का केली नाही?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. संबंधित व्यक्तींना कोणाचा आशीर्वाद आहे का, अशी शंका देखील नागरिक व्यक्त करत असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Illegal Russian Tour & Travels
NEET PG Goa: गोव्यात पहिला, तर भारतात 212 वा क्रमांक! आंजनेयने उंचावली ‘गोमेकॉ’ची प्रतिष्ठा; नीट-पीजी परीक्षेत दैदिप्यमान यश

या प्रकरणाबाबत पोलिस प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत असून, लवकरच प्रत्यक्ष कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन यावर नेमकी काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com