Goa Bridge: दक्षिण गोवाला जोडणारा उसगाव चौपदरी पुलाची 'तपपूर्ती'

Goa News: उसगावचा हा चौपदरी पूल स्थानिकांसाठी वरदानच ठरला आहे.
Usgao Bridge
Usgao BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: राज्यातील पहिल्यावहिल्या चौपदरी पुलाची तपपूर्ती झाली असून ज्या उद्देशासाठी हा चौपदरी पूल बांधण्यात आला, तो उद्देश जरी सफल झाला नसला तरी उत्तर आणि दक्षिण गोवा जोडणारा उसगावचा हा चौपदरी पूल स्थानिकांसाठी वरदानच ठरला आहे.

दरम्यान, या चौपदरी पुलाकडे 2012 मध्ये खाणी बंद झाल्यानंतर दुर्लक्षच करण्यात आले होते. मात्र, आता हा पूल रंगरंगोटीबरोबरच पथदीप बसवल्यामुळे चकाचक झाला असून एकापरीने ग्रामीण भागाच्या विकासासाठी अशाप्रकारचे उपक्रम सरकारने हाती घ्यायला हवेत, अशा प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केल्या.

Usgao Bridge
Goa Zuari Bridge| नोव्हेंबरपर्यंत ‘झुआरी’वरून चौपदरी वाहतूक होणार सुरू

दक्षिणेतील उसगाव आणि उत्तरेतील पाळी हा भाग जोडणाऱ्या उसगावच्या चौपदरी पुलाचे 25 फेब्रुवारी 2009 मध्ये उद्‍घाटन झाले, पण हा चौपदरी पूल बांधण्यामागचा उद्देश म्हणजे उसगावच्या जुन्या एकेरी वाहतुकीच्या पुलामुळे कायम वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत होती, ती दूर करण्यासाठीच या पुलाची उभारणी खाण कंपन्यांच्या संघटनेने केली होती.

उसगावचा सर्वांत आधीचा पूल पोर्तुगिजांनी गोवा सोडताना पाडला, पण त्यानंतर या पुलाची उभारणी त्वरित करताना केवळ एक वर्षाचा कालावधी घेतला. एक दणकट पूल त्याकाळी उभारला गेला. फक्त या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू राहिल्याने वाढत्या खनिज वाहतुकीमुळे रोजच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू लागली.

Usgao Bridge
Navratri 2022: 'गोमन्तक यंग इन्स्पिरेटर्स'तर्फे दांडिया कार्यशाळेचे आयोजन!

त्यामुळेच राज्यातील खाण कंपन्यांच्या संघटनेने एकत्रित येऊन या चौपदरी नवीन पुलाची उभारणी केली. मात्र, पूल कार्यरत झाल्यानंतर केवळ दोनच वर्षे या पुलाची सेवा खनिज वाहतुकीला झाली. 2012 मध्ये खाणी बंद झाल्यानंतर हा पूल केवळ नागरिकांच्या वाहतुकीसाठी उपयोगी पडला.

रामदास शिवा नाईक, ग्रामस्थ, पाळी-

तसे पाहिले तर या चौपदरी पुलाचे काम खाण कंपन्यांमुळेच पूर्ण झाले. उत्तर आणि दक्षिण गोवा जोडणाऱ्या या पुलाची मोठ्या प्रमाणात खनिज वाहतूक होत असल्याने आवश्‍यकता होती, पण दोन वर्षानंतर खाणीच बंद झाल्यामुळे आता पुलावरून तुरळक वाहतूक सुरू आहे.

Usgao Bridge
Goa Agriculture: 'उत्पादन वाढीसाठी कृषी संशोधन गरजेचे'- प्रमोद सावंत

राजेंद्र उत्तम गावकर, तिस्क - उसगाव

एक काळ होता, ज्यावेळेला उसगावच्या जुन्या पुलावर कायम वाहतूक कोंडी व्हायची. पण आता चौपदरी पूल बांधला खरा, पण खाणी बंद झाल्या, त्यामुळे रोजगारही हिरावला असून या खनिज खाणी पुन्हा एकदा धडाडू दे, अशीच केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com