Mormugao Port: मोठी बातमी! मुरगाव बंदरात कंटेनर व्यवसाय सुरू, SCI जहाज दाखल; ‘एमपीए’बरोबरच राज्यालाही होणार लाभ

Mormugao port container business: मुरगाव बंदरातील डेल्टा पोर्ट मुरगाव टर्मिनल प्रा. लि. च्या धक्का क्र: १० व ११ वर सात वर्षांनी पुन्हा एकदा कंटेनर व्यवसाय सुरू झाला आहे.
Mormugao port container business
Mormugao port container businessDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: मुरगाव पत्तन प्राधिकरण (एमपीए) व्यवसाय वृद्धीसाठी व्यवस्थापन बंदरातील आस्थापनांना पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. तसेच बंदरात पुन्हा एकदा ‘कंटेनर’ व्यवसाय सुरू झाल्याने बंदराला पूर्वी सारखी गती प्राप्त होणार आहे. यामुळे एमपीएची अर्थ व्यवस्था पूर्वी सारखी भरारी घेणार असल्याचे मुरगाव पत्तन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एन विनोद कुमार यांनी सांगितले.

मुरगाव बंदरातील डेल्टा पोर्ट मुरगाव टर्मिनल प्रा. लि. च्या धक्का क्र: १० व ११ वर सात वर्षांनी पुन्हा एकदा कंटेनर व्यवसाय सुरू झाला आहे. कंटेनर घेऊन एससीआई मुंबई फिडर जहाजाचे गुरुवार (२०) रोजी पहाटे डेल्टा पोर्ट मुरगाव टर्मिनल धक्क्यावर आगमन झाले.

कंटेनरचे एमपीए अध्यक्ष डॉ. एन विनोद कुमार यांच्या हस्ते बावटा दाखवून अनावरण करण्यात आले. यावेळी एमपीए उपाध्यक्ष विनायका राव, उप वनरक्षक सौभाग्य पटनायक, वाहतूक व्यवस्थापक जेरॉम क्लेमेंत, डेल्टा पोर्ट मुरगाव टर्मिनलचे अध्यक्ष मोहिद्दिन अहमद, उपाध्यक्ष राघोबा कोटकर, संचालक सामील अहमद, एमपीए चे माजी उपाध्यक्ष गुरुप्रसाद राय , एससीआई फिडर जहाजाचे कॅप्टन. सतिश माधवन, कॅप्टन प्रदीप पचेता व इतर मान्यवर उपस्थित होते.

‘एमपीए’ अध्यक्ष डॉ. एन विनोद कुमार यांनी कंटेनर व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याचा आनंद व्यक्त केला. बंदरात आणखीन चांगला माल (कार्गो) आयात - निर्यात करण्यात येणार आहे. एमपीए ला आर्थिकरित्या बळकटी देण्यासाठी एमपीए डेल्टा पोर्ट मुरगाव टर्मिनल समवेत खंबीरपणे उभे राहणार असल्याचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी सांगितले.

Mormugao port container business
Mormugao Port: मुरगावातील कोळसा हाताळणी प्रकरणी राज्‍य, केंद्राला नोटीस! 4 आठवड्यांत उत्तर सादर करण्‍याचा आदेश

मुरगाव बंदरातील डेल्टा पोर्ट वर कंटेनर व्यवसाय सुरू झाल्याबद्दल मुख्यमंत्री सावंत यांनी खास अभिनंदन केल्याचे विनोद कुमार यांनी सांगितले. मोहिद्दिन अहमद म्हणाले की, कंटेनर व्यवसाय सुरू करून डेल्टा पोर्टने बंदराच्या अर्थ व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. सामील अहमद यांनी डेल्टा पोर्टच्या इतर व्यवसायांची माहिती दिली. सूत्रसंचालन पूजा नाईक यांनी केले. बेर्नाद आद्राद यांनी आभार मानले.

Mormugao port container business
Mormugao Old Buildings : मुरगावात ४० इमारती धोकादायक! पालिका इमारतींचाही समावेश; ठोस कृती करण्याची गरज

‘एमपीए’बरोबरच राज्याला लाभ!

डॉ. राघोबा कोटकर म्हणाले की, कंटेनर व्यवसाय २०१८ नंतर बंद झाला होता. २०२५ मध्ये पुन्हा एकदा 'कंटेनर' व्यवसाय डेल्टा पोर्ट मध्ये सुरू झाल्याने, याचा एमपीए बरोबर राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कुशल नेतृत्व तसेच राज्याचे उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांचे लाभलेले सहकार्य. यामुळे बंदराचा बऱ्या पैकी विस्तार होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com