Horoscope: धन, यश आणि प्रगती! नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 3 राशींसाठी महायोग, वाचा तुमचं राशीभविष्य

Weekly Horoscope 24 to 30 November 2025: नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा विविध राशींसाठी वेगवेगळे अनुभव घेऊन येणार आहे.
Weekly Horoscope 24 to 30 November 2025
Weekly Horoscope 24 to 30 November 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा विविध राशींसाठी वेगवेगळे अनुभव घेऊन येणार आहे. काहींसाठी हा काळ आनंददायी व यशस्वी ठरेल, तर काहींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

मेष : हा आठवडा आनंदाचा असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि बचत वाढेल. प्रेमात स्थैर्य राहील, मात्र व्यावसायिक क्षेत्रात अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घ्यावी.

वृषभ : नवीन सुरुवात करण्यासाठी योग्य काळ आहे. वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्य संतुलित राहील. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहणे गरजेचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने पोटाच्या तक्रारी संभवतात.

Weekly Horoscope 24 to 30 November 2025
Goa Crime: 11 खून, अपहरण, चोऱ्या! गुन्हेगारीत परप्रांतीयांचा वाढता सहभाग चिंताजनक; कृतिदल स्‍थापण्‍याची मागणी

मिथुन : आर्थिक स्थिती स्थिर राहील व नवीन घर खरेदीचे योग आहेत. प्रेमसंबंध सुधारतील. मात्र विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत गॅस व सांधेदुखी संभवतात.

कर्क : हा आठवडा आरामदायी ठरेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. अनावश्यक खर्च टाळा. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवा. मानसिक तणावामुळे योग-ध्यान आवश्यक.

सिंह : कुटुंबासाठी फलदायी आठवडा. आर्थिक स्थिती सुरक्षित राहील. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ. कामात यश मिळेल पण अभ्यासात अधिक लक्ष द्यावे लागेल.

कन्या : थोड्या अडचणी संभवतात. शांत राहा व वाद टाळा. आर्थिक सुधार दिसेल. वैवाहिक जीवनात संवाद महत्त्वाचा आहे. आरोग्य सामान्य राहील.

Weekly Horoscope 24 to 30 November 2025
Goa Police Meeting: 'पोलिसांकडूनच लपविले जातात गुन्हे'! बैठकीत CM सावंतांनी सुनावले खडे बोल; बेफिकीरीबद्दलही केली नाराजी व्यक्त

तुळ : हा आठवडा उत्तम ठरेल. आर्थिक स्थैर्य राहील. नातेसंबंध मजबूत करण्याची गरज आहे. शिक्षणात लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेल.

वृश्चिक : लाभदायक आठवडा असून करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक सावधगिरी बाळगा. आरोग्याच्या बाबतीत रक्तदाब व पाय दुखण्याकडे लक्ष द्या.

धनु : काही अडथळे येऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवा. विवाहाचे योग संभवतात. विद्यार्थ्यांनी अधिक प्रयत्न करावेत.

मकर : आर्थिक सुधार होईल पण धोकादायक गुंतवणूक टाळा. वैवाहिक जीवनात सुधार होईल. आरोग्याच्या बाबतीत छातीत त्रास जाणवू शकतो.

कुंभ : थोडा तणावपूर्ण काळ. बोलण्याआधी विचार करा. आर्थिक चिंता राहील पण लवकरच परिस्थिती सुधारेल. डोकेदुखी व मायग्रेन संभवतो.

मीन : हा आठवडा अनुकूल आहे. आर्थिक लाभ व यश मिळेल. नातेसंबंध मजबूत होतील. आरोग्य चांगले राहील, मात्र उष्णतेपासून काळजी घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com