Goa Agriculture: पिता-पुत्राची किमया खाणपट्ट्यातील शेतीत पिकवलं 'सोनं'!

Goa News: सुमारे 12 एकर जमीन असून, चारही बाजूंनी खड्ड्यांनी वेढलेली होती.
Nagesh Samant | Varad Samant
Nagesh Samant | Varad SamantDainik Gomantak

Goa Agriculture News: धारबांदोडा तालुक्यातील तातोडी परिसरात नागेश सामंत व वरद सामंत यांची सुमारे 12 एकर जमीन असून, ती चारही बाजूंनी खड्ड्यांनी वेढलेली आहे. तसेच ही जमीन खाण लीज क्षेत्रात आहे. त्‍यामुळे खाण लॉबींकडून जमीन विकण्यासाठी वारंवार दबाव आला आणि अजूनही येत आहे. परंतु हा दबाव झुगारून आम्‍ही आमची जमीन शेतीसाठी राखून ठेवली आहे, असे सामंत पिता-पुत्राने ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

प्रायोगिक शेती आणि खाणपट्ट्यातील जमिनीतून बागायती पिकांचे उत्पन्न घेऊन राज्यातील प्रगतिशील शेतकरी म्हणून उदयास आलेल्या वरद सामंत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव झालेला आहे, येथे येथे उल्लेखनीय. ही आमची वडिलोपार्जित जमीन आहे आणि आम्हाला ती आमच्या कुटुंबासाठी राखून ठेवायची होती.

Nagesh Samant | Varad Samant
Lumpy skin Disease : अखेर ‘लम्पी’चा गोव्यात शिरकाव; 8 गुरांना बाधा

आम्हाला माहीत आहे की जमीन विकली की आमच्याकडे भरपूर पैसा येईल, पण ती आम्ही पुन्‍हा मिळवू शकणार नाही. हा विचार करूनच आम्ही आमची जमीन केवळ शेतीसाठी राखून ठेवण्यासाठी लढलो आणि त्यात यशस्वी झालो, असे नागेश सामंत यांनी सांगितले.

ऊस, गाजर उत्‍पादनही घेतले

2003 मध्ये आम्ही या जमिनीत उसाची लागवड सुरू केली. कारण या नगदी पिकातून चांगले उत्पन्न मिळते. अथक प्रयत्‍नानंतर 60 टन उसाचे उत्पादन केले. पण ऊस शेतीची प्रदीर्घ प्रक्रिया आणि मनुष्‍यबळाची कमतरता प्रयत्न यामुळे माझ्या मुलाने काही वर्षांपूर्वी बागायती पिकाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला व तो यशस्‍वीही झाला.

Nagesh Samant | Varad Samant
Goa Agriculture: 'उत्पादन वाढीसाठी कृषी संशोधन गरजेचे'- प्रमोद सावंत

शेतीत विविध प्रयोग करून प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला. 2016-17 मध्ये 500 चौरस मीटर क्षेत्रात गाजर लागवड करण्यास सुरूवात केली आणि त्यातून सुमारे दोन टन गाजराचे उत्पादन घेतले. पुढील वर्षी दोन एकर जमिनीत सुमारे पंधरा टन उत्पादन घेतले. तेव्हापासून आजतागायत आम्‍ही गाजराचे उत्पादन घेत असल्‍याचे सामंत यांनी सांगितले.

नागेश सामंत, शेतकरी-

शेजारील राज्‍यांत जाऊन आम्‍ही तेथील शेतीचे निरीक्षण केले. विविध पिकांवर संशोधनही केले आणि 2017-18 मध्ये ‘सितारा’ जातीच्‍या मिरचीची लागवड केली. त्‍यातही यश मिळाले आणि तब्‍बल 33 टन मिरचीचे उत्पादन घेऊन हमीभाव योजनेअंतर्गत फलोत्पादन महामंडळाला पुरविले.

Nagesh Samant | Varad Samant
Navratri 2022: 'गोमन्तक यंग इन्स्पिरेटर्स'तर्फे दांडिया कार्यशाळेचे आयोजन!

कलिंगडला प्रचंड मागणी: एक प्रयोग म्हणून आम्ही यंदा कलिंगडची लागवड केली. हा प्रयोग इतका यशस्वी झाला की ग्राहक कलिंगडासाठी थेट शेतात येऊ लागले. सुरूवातीला फक्त 10 रुपये किलो दराने कलिंगड विकले. मागणी एवढी वाढली की नंतर आम्ही दोन महिन्यांत 15 रुपये प्रतिकिलो दराने सुमारे 30 टन कलिंगड विकले. त्‍यात चांगला नफा मिळाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com