Goa Taxi Canva
गोवा

Goa Taxi Operators: ..गांभीर्याने घ्या नाहीतर तीव्र आंदोलन! टॅक्सी व्यावसायिकांचा पुन्हा एल्गार

Goa Taxi Drivers: टॅक्सी आंदोलन सरकारने गंभीरपणे घेतले नसल्याचा दावा; आश्वासन पूर्ण न केल्याने पुन्‍हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटण्याची शक्यता

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Taxi Operators Protest

पणजी: पेडणेतील टॅक्सी आंदोलकांचे आंदोलन सरकारने गंभीरपणे घेतले नसल्याचा दावा टॅक्सीधारकांनी केला असून सरकारने आंदोलकांना दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने ते पुन्‍हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटण्याची शक्यता आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटणे टाळले आणि वेळ दिली नाही तर पत्रकार परिषद घेऊन पुढील निर्णय जाहीर करण्याचा इशारा टॅक्सी आंदोलकांनी दिला आहे.

टॅक्सी आंदोलक रामा वारंग यांनी सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त आम्ही मागितले होते. आम्हाला लेखी उत्तर हवे होते. ते देण्याचे सरकारने मान्यही केले. मात्र, जेव्हा इतिवृत्त लिहिले, त्यात अनेक गोष्टींचा उल्लेख केला नव्हता. आम्ही विभागाला याचा जाब विचारल्यावर तीन दिवसांत तुम्हाला जो बदल अपेक्षित आहे, तो लिखित स्वरूपात द्या, असे कळविले. तसे लिहून दिल्यानंतरही अद्याप दुरुस्त केलेले इतिवृत्त आम्हाला दिलेले नाही.

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॅक्सी काऊंटर देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीच प्रक्रिया झालेली नाही. टॅक्सी आंदोलकांना यासंदर्भात विचारले असता, सरकार आमची थट्टा करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. सरकार आम्हाला गांभीर्याने घेत नसेल तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा टॅक्सी आंदोलकांनी दिला आहे.

आमदार गेले कुठे?

पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी टॅक्सी आंदोलकांचे कैवारी बनण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आंदोलनस्थळी भेटही दिली. आरोलकर यांनी सरकारची बाजू मांडल्यावर त्यांना आंदोलकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यानंतर आमदार आर्लेकर यांनी मुख्यमंत्र्यांसोबत आंदोलकांची बैठक निश्चित केली. मात्र, टॅक्सी आंदोलकांच्या मागण्या पूर्ण झाल्या की नाहीत, हे एकाही आमदाराने विचारले नसल्‍याने दोन्‍ही आमदारांच्‍या विरोधात टॅक्सी आंदोलक बोलू लागले आहेत.

‘तो’ मुद्दाच गायब

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत आम्ही पिकअप पॉईटवर ५० रुपये घेण्यात यावेत, अशी मागणी केली होती. या मागणीला मुख्यमंत्र्यांनीही संमती दिली होती. मात्र, जेव्हा बैठकीचे इतिवृत्त लिहिले आणि लिखित स्वरूपात आम्हाला दिले, तेव्हा हा मुद्दाच त्यातून गायब केला होता. याची दुरुस्ती व्हावी आणि हा मुद्दा नमूद करावा, यासाठी आम्ही पत्रही दिले. मात्र, अजून दुरुस्त केलेले इतिवृत्त आम्हाला मिळाले नसल्याची माहिती रामा वारंग यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT