Goa Taxi App Launched Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi App Launched: गोवा टॅक्सी अ‍ॅपचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते लोकार्पण

गोव्यात टॅक्सी बूक करणे होणार सोपे

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Taxi App Launched: गोवा सरकारने शुक्रवारी, 15 सप्टेंबर रोजी गोवा टॅक्सी अ‍ॅप लाँच केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते या अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर, पर्यटन संचालक सुनिल अंचिपाका प्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, ज्यांना गोवा माईल्स अ‍ॅप जॉईन करायचे नाही ते गोवा टॅक्सी अ‍ॅप जॉईन करू शकतात. मोपा येथील 500 हून अधिक टॅक्सी चालकांनी यापुर्वीच हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. राज्याचे पाठबळ असलेल्या या अ‍ॅपमुळे ऑनलाइन टॅक्सी बुकिंग सेवा सोपी होणार आहे.

गोवा टॅक्सी अ‍ॅपमुळे टॅक्सीचालक बंधूंना तंत्रज्ञानाचे पाठबळ मिळेल. राज्यातील अधिक चांगल्या, सुरक्षित, विश्वासार्ह, ग्राहकाभिमुख टॅक्सी व्यवसायासाठी मी सर्व टॅक्सी चालकबंधूंनी या अ‍ॅपचा स्विकार करावा, असे आवाहन करतो.

सावंत म्हणाले की, या अ‍ॅपच्या शुभारंभामुळे पर्यटन क्षेत्रात तंत्रज्ञान आणले गेले आहे, ज्यामुळे किनारपट्टीच्या राज्यात येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक ती सुविधा उपलब्ध होईल. राज्यातील पर्यटकांची संख्या वाढेल, त्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.

टॅक्सी अ‍ॅप सुरू करणे हेदेखील त्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. राज्यातील सर्व पर्यटकांना सुरक्षित वाटले पाहिजे, त्यामुळे पर्यटन वाढीस मदत होईल.

सावंत म्हणाले की, पर्यटक तक्रार करत होते की मुंबई ते गोव्याला विमानाने प्रवास करणे स्वस्त आहे, परंतु टॅक्सीने गोव्यातील हॉटेलमध्ये पोहोचणे महाग आहे. पण, आता या अ‍ॅपमुळे या किनारपट्टीच्या राज्यातील टॅक्सी भाड्यांबाबत तक्रार करणाऱ्या पर्यटकांचा प्रवास खर्च कमी होण्यास मदत होईल.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, गोवा टॅक्सी अ‍ॅप सॉफ्ट लॉन्च झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (MIA), मोपा येथे आधीपासूनच कार्यरत आहे. 500 हून अधिक टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर आधीच अॅपमध्ये सामील झाले आहेत.

अ‍ॅपबाबत ते समाधानी आहेत. राज्य सरकारने टॅक्सी चालकांच्या मदतीसाठी हे अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपशी संलग्न असलेल्यांना विधवा योजना, पेन्शन योजना, लग्नासाठी आर्थिक मदत आणि त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती यांसारखे फायदे मिळतील.

टॅक्सी असोसिएशनने या योजना प्रस्तावित केल्या आहेत. पर्यटन हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग आहे. राज्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनात पर्यटनाचे योगदान वाढवण्यासाठी, आपण पर्यटकांच्या प्रमाणापेक्षा दर्जेदार पर्यटकांचा विचार केला पाहिजे.

जेव्हा गोवा बियाँड बीच अशी कल्पना मांडली जाते, तेव्हा पर्यटकांसाठी वाहतुकीची मुख्य चिंता असते. टॅक्सी सेवा ही केवळ पर्यटकांपुरती मर्यादित न राहता स्थानिक लोकांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठीदेखील आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT