Goa Coastal Zone: किनाऱ्यावरील अतिक्रमणे हटवणार : पर्यटन संचालक

सरकारी मालमत्तेत बेकायदा अतिक्रमण
Goa Coastal Zone
Goa Coastal ZoneDainik Gomantak

राज्यातील किनारपट्टीवरील सरकारी मालमत्तांवर झालेली बेकायदा अतिक्रमणे न्यायालयाच्या आदेशानुसार हटविली जात आहेत. ही अतिक्रमणे हटवण्यासाठी पर्यटन विभागाने सर्वेक्षण सुरू केले असल्याची माहिती पर्यटन संचालक सुनील कुमार अंचिपाका यांनी दिली.

गोवा हे पर्यटन राज्य असल्याने हजारो पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर आनंद लुटण्यासाठी येतात, त्यामुळे सरकारी मालमत्तांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाला होता.

त्यावेळी पर्यटन खात्याने सरकारी मालमत्तांवरील बेकायदा अतिक्रमणांचे सर्वेक्षक करून आवश्यक ती कारवाई करेल, असे सांगण्यात आले होते.

Goa Coastal Zone
बहुउद्देशीय प्रदर्शनाला जनतेचा अल्प प्रतिसाद; सरकारकडून आयोजन

याबाबत पर्यटन संचालक सुनील कुमार अंचिपाका यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार किनारी भागातील बेकायदा अतिक्रमणे आणि बांधकामे हटवण्यात येत आहेत.

पर्यटन मास्टर प्लॅन सल्लागाराला नोटीस

पर्यटन संचालक सुनील कुमार अंचिपाका यांनी उघड केले की, राज्यासाठी पर्यटन मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी नेमलेल्या सल्लागाराला कामात अपयश आल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

दरम्यान, सल्लागाराने जबाब नोंदविला असून पुढील कार्यवाही सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com