minor minerals  Dainok Gomantak
गोवा

Online Permit : गौण खनिज अवैध वाहतूक रोखण्यासाठी गोवा सरकार सज्ज; नवी नियमावली लागू

खाण आणि भूविज्ञान संचालनालयाने दिली माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी: गेल्या काही दिवसांपासून गोवा राज्यातील वाळूसह गौण खनिज अवैध वाहतूकीचा मुद्दा चर्चत आला आहे. इतर राज्यातून खनिजांची अवैध वाहतूक होत असल्याचे प्रकार समोर आल्याने अवैध वाहतूक रोखण्यासाठीन गोवा राज्य खाण आणि भूविज्ञान संचालनालयाने (डीएमजी) इतर राज्यांमधून वाळूसह गौण खनिजे आयात करण्यासाठी ऑनलाइन वाहतूक परमिट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

(Goa state start Online transit permit for import of sand minor minerals from 27 September )

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 27 सप्टेंबरपासून डीएमजी ऑनलाईन परवानग्या जारी करत आहे. गोवा गौण खनिज सवलत नियम, 1985 च्या नियम 47 नुसार, इतर राज्यांमधून गौण खनिजे गोव्यात आणण्यासाठी डीएमजीकडून वैध परवाना मिळणे आवश्यक आहे. "ऑनलाइन परवाने जारी करण्याची प्रणाली मंगळवारपासून थेट सुरू होईल.

हा परवाना मिळण्यासाठी अर्जदारांनी अधिकृत वेबसाइट, संचालनालयाच्या वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे," असे डीएमजी संचालक सुरेश शानभोगे यांनी सांगितले. ऑनलाइन परमिट मिळविण्यासाठी, अर्जदाराने इतर राज्यांमध्ये गौण खनिजे वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या वाहनाची नोंदणी करणे, इतर तपशील ऑनलाइन भरणे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अर्जदाराला पेमेंट ऑनलाइनही करता येणार आहे.

पुढे बोलताना शानभोगे म्हणाले की, संचालनालय अशा अर्जांवर ऑनलाईन प्रक्रिया करेल आणि सर्व प्रक्रियेचे पालन करणार्‍या अर्जदारांना परवाने तातडीने देईल. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या वगळता अर्ज केल्यानंतर 24 तासांच्या आत असे परवाने दिले जातील. अर्ज केल्यानंतर अर्जदारांना मोबाईलवर एक संदेश मिळेल आणि अर्जांना मंजूरी मिळाली आहे. असा ईमेल मिळेल. अशी माहिती त्यांनी दिली.

डीएमजी द्वारे जारी केलेले परवाने अर्जदार डाउनलोड करू शकतात. तसेच परवान्याची एक प्रत परिवहन संचालनालयाला ईमेल केली जाईल आणि दैनंदिन परवान्यांची यादी दिली जाईल. यावेळी वाहतूक संचालनालयाकडून सीमा चेक पोस्टवर परवाने देण्याची सुरु असलेली मॅन्युअल प्रणाली 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. त्यानंतर मात्र ती बंद केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT