Goa Rabies Vaccination : रेबीज प्रतिबंधासाठी नव्वद हजार श्वानांचे करणार लसीकरण

गोव्यात 28 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान रेबीज लसीकरण मोहीम
Rabies Vaccination
Rabies Vaccination Dainik gomantak

गोव्याने रेबीज मुक्त दर्जा प्राप्त केला आहे, कारण राज्यात गेल्या चार वर्षात रेबीजमुळे मृत्यूची नोंद झालेली नाही. असे असले तरी यंदा गोवा सरकारने रेबीज लसीकरण व्यापक केले असून राज्यात रेबीजबाबत जागृती केली जात आहे. त्यानुसार श्वानांच्या लसीकरणासाठी गोव्यातील 12 तालुक्यात143 केंद्रांवर स्टॅटिक पॉइंट रेबीज लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे.

(Rabies vaccination campaign in Goa from Sept 28 to Nov 1)

Rabies Vaccination
Goa Crime : राज्यात दरमहा होताहेत सरासरी 4 खून

मिशन रेबीज प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारी ही मोहीम जागतिक रेबीज दिन म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि 1 नोव्हेंबरपर्यंत चालेल. पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभागाने नागरिकांना लसीकरणाबाबतची माहिती मिळवण्यासाठी अथवा रेबीजबाबत अधिक माहिती घेता यावी यासाठी हॉटलाइन देखील सुरू केली आहे. त्यानुसार नागरिक 7744029586 या क्रमांकावर संपर्क करत आवश्यक ती माहिती मिळवू शकणार आहेत.

Rabies Vaccination
Chimbel Junction : चिंबल जंक्शनवर उड्डाणपूल लवकर उभारा

9 लाखांहून अधिक कुत्र्यांचे केले लसीकरण

गेल्या 6 वर्षात सरकारने रेबीज लसीकरण मोहिमेवर सुमारे 3.7 कोटी रुपये खर्च केले असून या प्रकल्पांतर्गत 9 लाखांहून अधिक श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे. अशी माहिती मंत्री निलकंठ हर्णळकर यांनी दिली. राज्यात दरवर्षी सुमारे 90,000 श्वानांचे लसीकरण केले जाते. तथापि, शेजारील राज्ये अद्याप रेबीजमुक्त नसल्यामुळे, गोव्याचा रेबीज मुक्तदर्जा राखण्यासाठी या मोहीमेत वर्षाला सुमारे 66.54 लाख रुपये खर्चून चालविली जात आहे.

सीमावर्ती तालुक्यांमध्ये 4 लसीकरण केंद्रे

“लसीकरण, पाळत ठेवणे आणि जागरूकता हा प्रकल्पाचा भाग आहे. ओरल रेबीजची लस देखील बंद आहे,” विभाग अधिकाऱ्यांनी माहिती दिली. सातारी, काणकोण, डिचोली आणि पेडणे या सीमावर्ती तालुक्यांमध्ये 4 लसीकरण केंद्रे शेजारील राज्यातील श्वानांकडून विषाणू पसरू नयेत याची काळजी घेण्यासाठी मोहिमेनंतरही सतत कार्यरत राहतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com