Goa News: शैक्षणिक क्षेत्रातील 'मांडवी' उपक्रमाचा शानदार शुभारंभ!

Panjim: 'मांडवी' या उपक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी उच्च शिक्षण संचालनालयाने CEC सोबत करार केला.
Inauguration Mandvi Initiative
Inauguration Mandvi InitiativeDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim: उच्च शिक्षण संचालनालयाने निर्माण केलेला ‘मांडवी’ हा उपक्रम आधुनिक युगात शिकणाऱ्यांसाठी नवा पूल ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. ते उच्च शिक्षण संचालनालयाने निर्माण केलेल्या ‘मांडवी’ या उपक्रमाच्या उद्‌घाटनाप्रसंगी बोलत होते.

पणजी येथील मनोरंजन सोसायटीत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मंचावर शिक्षण सचिव रवी धवन, मुख्य सचिव पुनीत गोयल, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर, प्रो. कविता असनानी, प्रो. विठ्ठल तिळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

Inauguration Mandvi Initiative
CM Pramod Sawant : दुकानांमध्येच व्यवसाय करा, आता रस्त्यावर विक्री नको!

कविता असनानी यांनी अहवाल वाचन करून मॅसिव्ह ऑनलाईन कोर्ससंदर्भातील (MOOCs) माहिती दिली. ‘मांडवी’ या उपक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी उच्च शिक्षण संचालनालयाने सीईसी (Consortium for Educational Communication) सोबत करार केला. या करारांतर्गत संगीत आणि विश्लेषणात्मक रसायनशास्त्र हे दोन कोर्स सीईसीला सुपुर्द करण्यात आले. यावेळी या उपक्रमाशी संबंधित समन्वयक शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. तर विठ्ठल तिळवी यांनी आभार मानले.

Inauguration Mandvi Initiative
Chimbel Junction : चिंबल जंक्शनवर उड्डाणपूल लवकर उभारा

असा आहे ‘मांडवी’ उपक्रम

* मांडवी (Mentoring and Nurturing Digital and Virtual Initiatives) या उपक्रमाच्या माध्यमातून उच्च शिक्षण संचालनालय मॅसिव्ह ऑनलाईन कोर्स (MOOCs) उपलब्ध करून देणार आहे.

* मॅसिव्ह ऑनलाईन कोर्सच्या (MOOCs) माध्यमातून जागतिक दर्जाचे शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी शैक्षणिक तज्ज्ञ, चित्रपट दिग्दर्शक, अ‍ॅनिमेटर्स आणि कॅमेरामन यांना एकाच मंचावर आणले जाईल.

* मॅसिव्ह ऑनलाईन कोर्स स्वयंम या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले जातील.

‘सीईसी’सोबत करार: सीईसी ही दिल्ली येथील संस्था असून तिचे संचालक जगतभूषण नड्डा यावेळी म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणात डिजिटल तंत्रज्ञानाला महत्त्व असून या धोरणाची अंमलबजावणी सीईसी या संस्थेच्या माध्यमातून होते. सीईसी ही संस्था ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून देते. ज्यामुळे या देशातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही.

Inauguration Mandvi Initiative
Goa Crime : राज्यात दरमहा होताहेत सरासरी 4 खून

रवी धवन, सचिव, शिक्षण खाते-

गोव्याने समाजाच्या मोठ्या वर्गापर्यंत शिक्षण घेऊन जाण्यासाठी पाऊल उचललेले आहे. ‘मांडवी’ या उपक्रमाचा फायदा केवळ गोव्यातील विद्यार्थ्यांनाच नव्हे तर देशभरातील विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी आहे.

प्रसाद लोलयेकर,संचालक, उच्च शिक्षण संचालनालय-

उच्च शिक्षण संचालनालय ‘मांडवी’ या उपक्रमाद्वारे शिक्षकांना योग्य प्रशिक्षणाद्वारे ऑनलाईन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी प्रशिक्षित करेल. उच्च शिक्षण संचालनालय वर्षाच्या अखेरीस पाच अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com