Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

खेळाडूंसाठी आनंदाची गोष्ट! फुटसाल मैदानाचे थाटात उद्घाटन; आजपासून मैदान खेळाडूंना खुले

सत्तरीचा विकास हेच एकमेव ध्येय असून वर्षभरात सत्तरीत 120 कोटीची विकास कामे करणार

Ganeshprasad Gogate

Sattari News: सत्तरीचा विकास हेच एकमेव ध्येय असून येत्या वर्षभरात सत्तरीत १२० कोटीची विकास कामे करणार असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचार हाती घेऊन कार्यरत राहणार आहे.

त्याचबरोबर विविध योजना सत्तरीसाठी येणाऱ्या दिवसात राबविले जाणार आहे. सत्तरीवर आपले प्रेम असुन क्रीडा, वेलनेस क्लिनिकसाठी प्रयत्नशील राहणार आहे, सत्तरीच्या विकासात माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी पायाभरणी केली होती.

त्याची परंपरा पुढे नेत सत्तरीच्या विकासात सदैव आमचे योगदान राहणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वाळपई नगरपालिका प्रभाग 4 मधील मासोर्ले येथील फुटसाल मैदानाच्या लोकार्पण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केली.

ते म्हणाले की सत्तरीतील लोक हे आपले कुटुंब असून सत्तरीतील तरुणांना सरकारी नोकरी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर पर्येच्या आमदार डॉ दिव्या राणे, सुडाचे संचालक गुरुदास पिळणकर, नगराध्यक्ष शेहजीन शेख, सुडाचे अभियंता मुजावर शेख, माजी आमदार नरहरी हळदणकर, उपनगराध्यक्ष अनिल काटकर, अशोक कोंकरे, नगरसेवक रामदास शिरोडकर, फैजल शेख, सय्यद सरफराज, शराफत खान विनोद हळदणकर वैसुद्दीन सय्यद, नगरसेवक प्रसन्ना गावस, निर्मला साखळकर, केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, नगरगांव जिल्हा पंचायत सदस्य राजश्री काळे यांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "आमकां नरकासुर म्हणून, स्वताक देव समजू नाकांत", फातोर्डा मेळाव्यातील टीकेवर CM सावंतांचे सडेतोड प्रत्युत्तर; Watch Video

Browser Security Alert: तुमचा डेटा धोक्यात? भारत सरकारचा Chrome आणि Mozilla युजर्सना हाय अलर्ट, हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'हे' काम लगेच करा

Ashwin on Rohit Virat fitness: "आता वय वाढलंय तर...": रोहित आणि विराटबद्दल अश्विनचं वादग्रस्त विधान Watch Video

Gold Price Today: दिवाळीची धामधुम! सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले की उतरले? जाणून घ्या

Goa Rain: ऐन दिवाळीत 'बळीराजा' संकटात! हातातोंडाशी आलेला घास पाण्यात; 5 दिवसांसाठी Yellow Alert जारी

SCROLL FOR NEXT