Professional League Football गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या यंग बॉईज ऑफ टोंक (वायबीटी) संघाने शनिवारी जोशपूर्ण खेळ केला. त्यांनी बलाढ्य गतविजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबला गोलशून्य बरोबरीत रोखून एक गुण विभागून घेतला.
म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर शनिवारी तिसऱ्या फेरीतील सामना झाला. वायबीटी संघाचा हा स्पर्धेतील पहिला गुण ठरला. अगोदरच्या लढतीत त्यांना सेझा फुटबॉल अकादमीने चार गोलने नमविले होते.
लागोपाठ दोन सामने जिंकलेल्या धेंपो क्लबची ही पहिली बरोबरी ठरली. त्यांचे आता तीन लढतीतून सात गुण झाले आहेत.
सामन्यातील पहिल्या वीस मिनिटांतील खेळाचा अपवाद वगळता वायबीटी संघाने धेंपो क्लबला चांगली लढत दिली. त्यांचा गोलरक्षक सौरव चक्रवर्ती याची कामगिरीही उठावदार ठरली. त्याने २३व्या मिनिटास नेसियो फर्नांडिसचा प्रयत्न उधळून लावला.
नंतर प्रतीक नाईक व आर्नोल्ड ऑलिंव्हेरा यांचे प्रयत्नही कमजोर ठरल्याने धेंपो क्लबला गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. स्पर्धेत रविवारी (ता. १०) म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर जीनो स्पोर्टस क्लब व एफसी गोवा यांच्यात लढत होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.