Indian Super League Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: एफसी गोवासमोर ईस्ट बंगालचे तगडे आव्हान

आयएसएल फुटबॉल: भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर आज सामना

किशोर पेटकर

Indian Super League कार्ल्स कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली ईस्ट बंगालने यावेळच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दमदार खेळ केलेला आहे. साहजिकच भुवनेश्वर येथील तटस्थ कलिंगा स्टेडियमवर त्यांच्याविरुद्ध शनिवारी (ता. 21) एफसी गोवासमोर तगडे आव्हान असेल.

कोलकात्यातील दुर्गापूजा उत्सवानिमित्त सामना भुवनेश्वरला हलविण्यात आला आहे. घरच्या मैदानावर फातोर्ड्यात पंजाब एफसीवर 1-0 आणि ओडिशा एफसीवर 3-2 असा विजय मिळविल्यानंतर एफसी गोवा संघ मोसमात प्रथमच अवे मैदानावर खेळत आहे.

त्यांचे सध्या सहा गुण आहेत. ईस्ट बंगालचे तीन लढतीतून चार गुण आहेत. स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत त्यांना बंगळूरने पराभवाचा धक्का दिला होता.

एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ ईस्ट बंगालला कमी लेखत नाहीत. ``त्यांच्यापाशी दर्जेदार खेळाडू आहेत, त्यापैकी हावी सिव्हेरियो, बोर्हा हेर्रेरा हे माझ्या मार्गदर्शनाखाली स्पेनमध्ये, तसेच हैदराबाद एफसी संघातून खेळलेले आहेत.

ते धोकादायक आहेत. त्यांच्या संघात अनुभवी खेळाडू असल्यामुळे आमच्यासाठी सामना निश्चितच कठीण आहे हे मी जाणून आहे. चांगला खेळ करणारा संघ निश्चितच जिंकणार,`` असे मार्केझ यांनी शनिवारच्या लढतीविषयी सांगितले.

दृष्टिक्षेपात...

  • आयएसएल स्पर्धेत ६ लढती, एफसी गोवाचे ३, तर ईस्ट बंगालचा १ विजय, २ बरोबरी

  • २०२२-२३ मोसमात एफसी गोवा कोलकात्यात २-१, फातोर्ड्यात ४-२ फरकाने विजयी

  • एफसी गोवाचा सध्याचा फॉर्म ः विजय, विजय

  • ईस्ट बंगालचा सध्याचा फॉर्म ः बरोबरी, विजय, पराभव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cooking Oil Recycling: हॉटेल्स, रेस्टॉरंट्सच्या वापरलेल्या तेलाची डिजिटल नोंद होणार? गोवा सरकारला 18 महिन्यांचा आराखडा; प्रस्तावित नियम काय?

Supreme Court: 'धर्मांतरानंतर आरक्षणाचा लाभ मिळणार नाही'! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; नेमंक प्रकरण काय?

Imran Khan: 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोड! इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस, सीजेपी आंदोलनात सहभागी होणं पडलं महागात

State Library Policy: वाचनालय धोरणाचे भिजत घोंगडे कायम! ग्रामीण ग्रंथपालांचे वेतन आणि डिजिटल वाचनालयाचा प्रश्न प्रलंबित

IDC Exit Support Scheme: गोव्यात बंद उद्योगांना मिळणार 'नवसंजीवनी'! आयडीसीच्या योजनेला मुदतवाढ; 1,969 रोजगारांची अपेक्षा

SCROLL FOR NEXT