Shigmotsav parade Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2025: गोव्याच्या परंपरेचा उत्सव! मडगावात शिमगोत्सवाचा जल्लोष सुरू; 16 मार्चला निघणार चित्ररथांची भव्य मिरवणूक

Madgaon Shigmotsav Goa: यंदाच्यावर्षी १६ मार्च हा मुख्य दिवस असणार आहे

Akshata Chhatre

सासष्टी: मडगावात शिमगोत्सवाला रविवार (ता. १०) सुरवात होणार आहे. शिगमोत्सव हा गोव्यातील संस्कृतीचा एका महत्वाचा घटक असून, . या दिवशी रोमटामेळ, लोकनृत्य व चित्ररथ मिरवणुकीचे तसेच वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती मडगाव शिमगोत्सव समितीचे उपाध्यक्ष तथा आमदार उल्हास तुयेकर व नगराध्यक्ष तथा समितीचे खजिनदार दामोदर शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मडगावात १६ तारखेला शिगमोत्सवाची भव्य मिरवणूक!

यंदा मडगावातील ३८ व्या शिगमोत्सवाची सुरवात सोमवारी सकाळी १०.३० वा. पिंपळकट्ट्यावर श्रीफळ ठेवून व श्री दामबाबाचे आशीर्वाद घेऊन झालीये. यानंतर आता १६ तारखेला पालिका चौकात दुपारी ३ वाजल्यापासून वेशभूषा स्पर्धेला सुरुवात होणार आहे, तर संध्याकाळी ४ वाजता होली स्पिरिट चर्चकडून प्रथम लोकनृत्य, नंतर रोमटामेळ पथके,चित्ररथ मिरवणूक सुरू होईल.

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात शिगमोत्सवाची काही वेगळीच मजा असते. गोमंतकात जपली जाणारी परंपरा याचं प्रमुख उदाहरण म्हणजे इथे साजरा केला जाणारा शिगमोत्सव. होळीनंतर गोव्यात शिगमोत्सवाची सुरुवात होते.

घोडेमोडणी, चित्ररथ हे गोव्यातील शिगमोत्सवाचे प्रमुख आकर्षण असतात. गोव्यात होणार शिगमोत्सव पर्यटकांना देखील अनुभवता यावा म्हणून पर्यटनविभागाकडून याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. गोव्यात मार्च महिन्यात एकूण १५ दिवस वेगवेगळ्या ठिकाणी शिगमोत्सव साजरा केला जाणार आहे.

गोव्यात होणाऱ्या शिगमोत्सवाच्या तारखा

  • १५ मार्च: फोंडा

  • १६ मार्च: मडगाव

  • १७ मार्च: केपे

  • १८ मार्च:शिरोडा आणि कुडचडे

  • १९ मार्च: धारबांदोडा

  • २० मार्च: कळंगुट

  • २१ मार्च: वास्को

  • २२ मार्च:पणजी

  • २३ मार्च: म्हापसा आणि सांगे

  • २४ मार्च: मांद्रे आणि काणकोण

  • २५ मार्च: पेडणे

  • २६ मार्च: वाळपई आणि कुंक्कळी

  • २७ मार्च: डिचोली

  • २८ मार्च: साखळी

  • २९ मार्च: पर्वरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचा 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT