Shigmotsav Goa: "जिकल्या बिगर सोडचेंना"!! तिसवाडीत शिगमोत्सवावरून तणाव; दोन गटांत संघर्ष, पोलिसांची मध्यस्थी!

Tiswadi Shigmotsav Conflict: जिल्हाधिकाऱ्यांची ऑर्डर असून देखील एका गटाने शिगमोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केल्याने वाद निर्माण झाला
Goa festival dispute
Goa festival disputeDainik Gomantak
Published on
Updated on

तिसवाडी: धुळापे खोर्ली येथील श्री रवळनाथ सातेरी देवस्थानाच्या शिगमोत्सवावरून गावात तणाव निर्माण झाला. श्री सातेरी रवळनाथ देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांनी ढोल वाजवून नम केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. शनिवार (दि.८) रोजी जिल्हाधिकाऱ्यांची ऑर्डर असून देखील एका गटाने शिगमोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केल्याने वाद निर्माण झाला होता.

भिकू धुळपकर आणि सदस्यांनी शिगमोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फाल्गुन गावस आणि सदस्यांनी केलाय. शनिवार (दि. ८) रोजी पोलिसांनी मध्यस्थी करीत वाद थांबविला, दरम्यान पोलीस सरकारी गाडीने न येता खाजगी गाडीने आल्याने काही ग्रामस्थांनी या गोष्टीवर आक्षेप घेतला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर जरी हा वाद आटोक्यात आला असला तरीही तरंग उभे करताना परत वाद होण्याची शक्यता आहे.

Goa festival dispute
Goa Shigmo Festival : शिरोड्यातील शिवनाथाचा वार्षिक शिमगोत्सव साजरा

फाल्गुन गावस आणि सदस्यांनी शनिवारी घडलेल्या प्रकाराबद्दल पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आहे. एकूण प्रकारानंतर रविवारी (दि.९) रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फाल्गुन गावस आणि सदस्यांनी असा दावा केला आहे की उपजिल्हाधिकाऱ्यांच्या ऑर्डर प्रमाणे ट्रस्टला शिगमोत्सव करण्यास कुठलाच हक्क नाही. कायद्यानुसार जर का काही वाद असतील तर शिगमोत्सव होऊ शकत नाही, मात्र प्रतिवादी भिकू धुपकर यांनी हा आदेश न मानता शिगमोत्सवाला सुरुवात केली.

मात्र दुसऱ्या बाजूला भिकू धुपकर यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कुणालाच त्रास न देता नम साजरी केली होती आणि त्याच प्रकारे तरंग सुद्धा उभे करणार आहेत. "आम्ही कुणालाच आमच्यात येऊन शिगमोत्सव साजरा करण्यास मनाई केली नाही. ज्यांना इच्छा आहे त्यांनी स्वखुशीने आमच्यासोबत येऊन शिगमोत्सव साजरा करावा" असं ते म्हणालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com