

PM-Kisan Samman Nidhi: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली. 13 मार्च 2026 रोजी 22वा हप्ता यशस्वीरित्या वितरित केल्यानंतर, आता देशभरातील कोट्यवधी शेतकरी 23व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारच्या नियमांनुसार, दर चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा केला जातो.
ताज्या माहितीनुसार, आगामी 23व्या हप्त्याचे वितरण जुलै ते ऑगस्ट 2026 या कालावधीत केले जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र, यावेळी हप्त्याचे पैसे खात्यात जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांना (Farmer) काही तांत्रिक बाबींची पूर्तता करणे अनिवार्य करण्यात आले, अन्यथा पात्र असूनही शेतकऱ्यांचे हात रिकामे राहू शकतात.
2026 पासून सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये एक मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल केला. आता केवळ ई-केवायसी पूर्ण असणे पुरेसे नाही, तर प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याकडे 'Farmer ID' असणे बंधनकारक करण्यात आले. जर तुम्ही अद्याप तुमची किसान आयडी तयार केला नसेल, तर तुमचा 23 वा हप्ता तांत्रिक कारणास्तव रखडू शकतो. यासोबतच, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे न येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या पोर्टलवरील 'Land Seeding' स्टेटस 'No' असणे हे आहे.
हप्ता येण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपले स्टेटस तपासावे आणि जर ते 'No' दिसत असेल, तर तात्काळ तहसील कार्यालय किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून खतावणीच्या आधारे ते व्हेरिफाय करुन घेणे गरजेचे आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बँक खात्याचे आधारशी असलेले लिंकिंग. सरकार डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे पैसे पाठवत असल्याने तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे आणि ते 'Active' स्थितीत असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, तुमच्या आधार कार्डवरील नावाचे स्पेलिंग आणि बँकेच्या पासबुकवरील नाव यात तफावत असल्यास 'FTO' (Fund Transfer Order) जनरेट होणार नाही आणि हप्ता मिळणार नाही.
हप्ता जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टलवर (pmkisan.gov.in) जाऊन 'Know Your Status' या पर्यायाद्वारे आपले ई-केवायसी, लँड सीडिंग आणि आधार बँक खाते सीडिंग या तिन्ही गोष्टींसमोर 'Yes' असल्याची खात्री करुन घ्यावी. या साध्या वाटणाऱ्या पण तांत्रिकदृष्ट्या गंभीर चुका टाळल्यास, आगामी 2000 रुपयांचा हप्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमच्या खात्यात जमा होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.