Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Pahalgam Terror Attack Response Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानमधील 9 प्रमुख दहशतवादी तळांना अचूक लक्ष्य केले होते.
Pahalgam Terror Attack Response Operation Sindoor
Operation SindoorDainik Gomantak
Published on
Updated on

Pahalgam Terror Attack Response Operation Sindoor: 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता, ज्यामध्ये 26 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र, या भ्याड हल्ल्याला भारताने अत्यंत आक्रमक प्रत्युत्तर दिले. 7 मे 2025 रोजी भारतीय संरक्षण दलाने 'ऑपरेशन सिंदूर' लाँच केले, ज्याचा मुख्य उद्देश पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना मुळासकट उपटून टाकणे हा होता.

आज या ऐतिहासिक कारवाईला एक वर्ष पूर्ण होत असताना, लश्कर-ए-तैयबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि जैश-ए-मोहम्मदचा मसूद अजहर यांचा दहशतीचा मोठा वाडा पत्त्यांसारखा कोसळल्याचे चित्र आहे. हे दोन्ही दहशतवादी आजही भारताच्या धाकाने सुरक्षित घरांमध्ये दडून बसले असून उघडपणे समोर येण्याची त्यांची हिंमत झालेली नाही.

Pahalgam Terror Attack Response Operation Sindoor
Operation Sindhur 2.0: 'ऑपरेशन सिंदूर 2.0' ने उडणार पाकड्यांचा थरकाप, भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडचा थेट इशारा; शत्रूच्या छाताडावर नाचणार 'भैरव' सैन्य! VIDEO

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने (India) पाकिस्तानमधील 9 प्रमुख दहशतवादी तळांना अचूक लक्ष्य केले होते. यामध्ये लाहोरजवळील मुरीदके येथील लश्कर-ए-तैयबाचे 200 एकरमध्ये पसरलेले मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले. दुसरे मोठे लक्ष्य बहावलपूर होते, जे जैश-ए-मोहम्मदचा गड मानले जाते. येथील कुख्यात जामिया मशीद सुभान अल्लाह कॅम्पस आणि मसूद अजहरशी संबंधित मदरसा भारताच्या क्षेपणास्त्राने जमीनदोस्त केला. या हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की, खुद्द मसूद अजहरने या कारवाईत आपल्या कुटुंबातील 10 सदस्यांना गमावल्याची कबुली दिली होती. याशिवाय कोटली आणि मुझफ्फराबादमधील दहशतवादी तळांवरही भारताने जबरदस्त प्रहार केला होता.

Pahalgam Terror Attack Response Operation Sindoor
Operation Sindhur: 'ऑपरेशन सिंदूर'चा थरार! भारतीय लष्कराने जारी केला सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ; पाकच्या एअरबेस आणि रडार यंत्रणेच्या विध्वंसाचा पुरावा जगासमोर

पहलगाम हल्ल्यानंतर मसूद अजहर बहावलपूरमध्ये होता, मात्र ऑपरेशन सिंदूरच्या धाकाने त्याला तिथून पळ काढावा लागला. त्याला बहावलपूरपासून 1200 किमी दूर असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये हलवण्यात आले. जुलै 2025 मध्ये तो स्कर्दू येथे वास्तव्यास होता, जिथे त्याला वेगवेगळ्या मशिदी आणि सरकारी गेस्ट हाऊसमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. पाकिस्तानचे (Pakistan) माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी तो अफगाणिस्तानात गेल्याचा दावा केला असला तरी, गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार तो अजूनही पाकिस्तानी लष्कराच्या सुरक्षेत लपलेला आहे.

Pahalgam Terror Attack Response Operation Sindoor
Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

दुसरीकडे, हाफिज सईदला ऑपरेशन सिंदूरपूर्वी लाहोरच्या जौहर टाउनमध्ये पाहिले गेले होते. पाकिस्तान सरकार जरी तो 2019 पासून तुरुंगात असल्याचे भासवत असले, तरी प्रत्यक्षात त्याला अनेकदा सार्वजनिक ठिकाणी फिरताना पाहिले गेले आहे. बिलावल भुट्टो यांनी एका मुलाखतीत हाफिज सईद आणि मसूद अजहरला भारताच्या स्वाधीन करण्याची तयारी दर्शवली होती, ज्यावर हाफिजचा मुलगा तल्हा सईद याने तीव्र संताप व्यक्त केला होता.

Pahalgam Terror Attack Response Operation Sindoor
Pakistan Air Strike: पाक-अफगाणिस्तान संघर्षात भारताची 'एन्ट्री'! अफगाण जनतेच्या सुरक्षेसाठी दिला पाठिंबा; 70 दहशतवादी मारल्याचा पाकड्यांचा दावा

सध्याच्या इंटेलिजन्स रिपोर्टनुसार, आयएसआय (ISI) या दोन्ही दहशतवाद्यांना रावळपिंडी, कराची आणि लाहोरमधील सुरक्षित घरांमध्ये सातत्याने शिफ्ट करत आहे. आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारताच्या सर्जिकल स्ट्राईकच्या दहशतीमुळे हे दोन्ही दहशतवादी सध्या केवळ सावलीसारखे जगत आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणा आजही या दोन्ही शत्रूंवर करडी नजर ठेवून असून, त्यांच्या प्रत्येक हालचालीचा मागोवा घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com