Sanguem Car Accident:  Dainik Gomantak
गोवा

Sanguem Car Accident: सांगे कार अपघातातील तिसरा मृतदेहही सापडला

राज्‍यभर हळहळ : माता-पित्‍यासह चिमुकल्‍याचा मृत्यू

गोमन्तक डिजिटल टीम

Sanguem Car Accident सांगेत काल सोमवारी रात्री नदीत कार कोसळून झालेल्‍या अपघातात माय-लेकाचा मृतदेह सापडला होता. आज मंगळवारी सकाळी सुमारे 10.05 वाजता दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मिलिंद नाईक (वय 38) यांचाही मृतदेह संगमेश्वर नदीतून बाहेर काढण्यात आला.

या हृदयद्रावक घटनेत आईवडिलांसह दोन वर्षांच्‍या चिमुकल्‍या बालकाला जीव गमवावा लागल्‍याबद्दल हळहळ व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

सोमवारी रात्री आठच्‍या सुमारास तारीपांटो पुलावर हा अपघात घडला होता. कार नदीत कोसळल्‍याचा आवाज झाल्‍यानंतर लोकांनी घटनास्‍थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाला कल्‍पना दिली.

दलाच्‍या जवानांनी घटनास्‍थळी धाव घेऊन दीड-दोन तासांच्‍या प्रयत्‍नानंतर नदीत पडलेल्‍या कारसह रेखा जाधव (३२) व दिव्‍यांश नाईक (२) यांचे मृतदेह पाण्‍यातून बाहेर काढले होते, पण गाडी चालवणारे मिलिंद नाईक यांचा थांगपत्ता लागू शकला नव्‍हता. आज सकाळी त्‍यांचाही मृतदेह सापडला.

स्थानिकांनी सांगितले की, तारीपांटो येथील या पुलावर जर संरक्षण कठडा असता, तर कदाचित हा अपघात घडला नसता. समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की, अपघात हा अपघात असतो. आम्ही त्या पुलावर आता क्रॅश बॅरिअर्स बसवणार आहोत.

तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून अपघात टाळता यावेत यासाठी सावधगिरीची पावले उचलण्यात येतील.

मुलीचा आक्रोश

मिलिंद नाईक यांचा मृतदेह इस्पितळात पाठविण्‍यासाठी जेव्हा शववाहिकेत घालण्यात आला, तेव्हा जवळच रस्त्याच्या कडेला उभी असलेली त्यांची 15 वर्षांची मुलगी ओक्‍साबोक्‍सी रडू लागली. काल तिनेच आपल्‍या आई व भावाच्या मृतदेहाची ओळख पटविली होती. ही मुलगी अनाथ झाली आहे. त्‍या मुलीची स्‍थिती पाहून तेथे उपस्‍थित लोकही हळहळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT