Goa Opposition MLAs
Goa Opposition MLAs Dainik Gomantak
गोवा

Goa Rajyasabha Poll 2023: राज्यसभा निवडणुकीसाठी विरोधकांची ठरवली 'ही' स्ट्रॅटेजी!

Akshay Nirmale

Goa Rajyasabha Poll 2023: गोव्यातील राज्यसभेच्या जागेसाठी २४ जुलैला मतदान होणार आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपकडून प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

त्यानुसार आज, मंगळवारी तानावडे यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. त्या पार्श्वभुमीवर राज्यातील विरोधकांची स्ट्रॅटेजी देखील समोर आली आहे.

राज्यसभा निवडणुकीत विरोधकांनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. काँग्रेस, आम आदमी पार्टी, गोवा फॉरवर्ड पार्टी, रिव्होल्युशनरी गोवन्स या पक्षांनी एकत्रित येऊन ही माहिती दिली आहे. तशा पद्धतीचे पत्रही प्रसारमाध्यमांना दिल्याचे समजते.

त्यावर विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगस, वीरेश बोरकर, कार्लोस परेरा, अल्टन डिकॉस्टा, क्रुझ सिल्वा यांच्या सह्या आहेत.

राज्यसभेच्या निवडणुकीत आमदार मतदान करत असतात. दरम्यान, विरोधकांनी अशी भूमिका घेतल्याने आता सदानंद शेट तानावडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होणार आहे. तथापि, विरोधकांकडून मात्र राज्यसभा निवडणुकीत उमेदवार न देणे, ही देखील स्ट्रॅटीज असल्याचे सांगितले जात असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, राज्यातील विधानसभेचे संख्याबळ पाहता भाजपचा उमेमदवार सहज जिंकेल, अशी स्थिती आहे. भाजपकडे सर्वाधिक 28 आमदार आहेत. याशिवाय 3 अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 2 आमदार असे एकूण 33 आमदार भाजपच्या बाजूने आहेत. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक एकतर्फी असणार आहे.

गोव्यातील राज्यसभेचे विद्यमान खासदार विनय तेंडुलकर यांचा कार्यकाल 28 जुलै रोजी संपत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घोडगावयलो

उत्क्रांतीचे झाड

Chhatrapati Shahu Maharaj : छत्रपती शाहू महाराजांचे पुण्यस्मरण

Hit & Run Case : घाेगळ येथे ‘हिट अँड रन’ प्रकरणात पत्रकार जखमी

Garbage Project : वेर्णा येथील कचरा प्रकल्पाला विरोध

SCROLL FOR NEXT