Karnataka-Goa Highway: कर्नाटक-गोवा महामार्गावर टोल वसुलीला सुरवात

कर्नाटक-गोव्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 748 चार लेनमध्ये अपग्रेड
highway file photo
highway file photo Gomantak Digital Team
Published on
Updated on

Karnataka-Goa Highway Toll: कर्नाटक-गोवा महामार्गावरील टोलवसुलीला 11 जुलैपासून सुरवात झाली आहे. खानापूर रोडवरील गणेबैल क्रॉस येथे टोलवसुली केली जात आहे.

टोलचे दरही जाहीर करण्यात आले आहेत आणि ते टोलनाक्यावर प्रदर्शित करण्यात आले आहेत. कर्नाटक आणि गोव्याला जोडणारा NH-748 (जुना NH-4A) अलीकडेच चार लेनमध्ये अपग्रेड करण्यात आला आहे.

highway file photo
Cansaulim News: कासावली येथील खाणीत 16 वर्षीय मुलगा बुडाला

बेळगाव-गोवा महामार्गावरील टोल वसुली सुरू करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ते बांधकाम कंत्राटदार एजन्सीला अधिकृत केले आहे. अशोका बेळगाव खानापूर रोड प्रायव्हेट लिमिटेड ही एजन्सी टोल वसूल करणार आहे.

महामार्गाच्या 30 किमी लांबीसाठी सवलत कालावधी 15 वर्षे आहे. स्थानिक गावातील रहिवासी दरमहा 330 रूपये भरून पास मिळवू शकतात. हायब्रीड अॅन्युइटी मोडवर हा हायवे तयार करण्यात आला आहे.

highway file photo
खासदार विनय तेंडुलकर 'चेकमेट' का झाले?

सवलतींमध्ये 24 तासांत परतीच्या प्रवासावर 25 टक्के सवलत आणि सर्व श्रेणींच्या वाहनांसाठी पैसे भरल्याच्या तारखेपासून एका महिन्यात 50 एकल प्रवासासाठी 30 टक्के सूट समाविष्ट आहे. टोल प्लाझा जिल्ह्यात नोंदणीकृत व्यावसायिक वाहने (राष्ट्रीय परवाना असलेली वाहने वगळून) (50 टक्के सवलत) आणि पात्र इतर वाहने देखील सवलतीसाठी पात्र आहेत.

तथापि, निश्चित्त ठरलेल्या भारापेक्षा जास्त भार असलेल्या वाहनांना लागू शुल्काच्या 10 पट रक्कम भरावी लागेल आणि अतिरिक्त भार काढून टाकावा लागेल.

एजन्सीसोबतच्या NHAI करारानुसार या प्रकल्पाला 1154.40 कोटी रूपये खर्च आला होता. या भांडवली खर्चाच्या वसुलीसाठी हा टोल वसुल केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com